Tuesday, July 8, 2025
Homeताजी बातमीमतदार जनजागृती गल्ली, बोळात; विकास पोहचेल तळागळात!

मतदार जनजागृती गल्ली, बोळात; विकास पोहचेल तळागळात!

शहरातील विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत येणाऱ्या परिसरात, चौकात, गल्ली, बोळ, चाळ, झोपडपट्टी, सोसायटी, कार्यालये आदी ठिकाणी जाऊन महापालिकेच्या यंत्रणेद्वारे मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीत मतदानाचे अधिकार बजावण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्यात करण्यात येत असून महापलिकेच्या आवाहनाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी आणि चिंचवड मतदार संघात मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त तथा स्वीप नोडल विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त अण्णा बोदडे यांच्या नियंत्रणाखाली मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने आजपासून शहरातील गल्ली, बोळ, चाळ, झोपडपट्टी, सोसायटी परिसरात जाऊन नागरिकांना येत्या निवडणुकीत मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

महापलिकेच्या वतीने मतदार जनजागृती करण्यासाठी स्वतंत्र स्वीप कक्ष स्थापित करण्यात आला असून या कक्षासह समाज विकास विभाग देखील या जनजागृती कार्यात सहभाग घेट आहे. ग क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील पथविक्रेते, ग क्षेत्रीय कार्यालय तुळजाई महिला बचत गट थेरगाव, मोरया महिला बचत गट थेरगाव व परिसरातील नागरिक, ड क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरातील महिला बचत गटाचे सदस्य व परिसरातील नागरिक, ह क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत राजीवगांधी नगर पिंपळे गुरव, अ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत परिसरातील नागरिकांनी मताचा अधिकार बजावण्याची शपथ घेतली. यावेळी समूह संघटक वैशाली खरात,शेखर जाधव, अमोल कावळे, कीर्ती वानखडे, वैशाली लगाडे, सुलक्षणा कुरणे, अमोल सोनवणे आदी समूह संघटक उपस्थित होते.

२१ हजार महिला बचत गटांच्या माध्यमातून २ लाख १० हजारांपेक्षा अधिक महिलां पर्यंत मतदार जनजागृती मोहीम घेऊन जाणार – विजय कुमार खोराटे

शहरात तळागळातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी महापालिकेकडील नोंदणीकृत २१ हजार महिला बचतगट तसेच १५० पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिक संघ यांच्यासह विविध माध्यमांद्वारे प्रयत्न करणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात मतदार जनजागृती अभियान आढावा बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उप आयुक्त अण्णा बोदडे, निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे, समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांच्यासह महापालिकेचे समाज सेवक, समूह संघटक, कर्मचारी उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त खोराटे म्हणाले, शहरातील विविध भागात तळागळात जाऊन मतदार जनजागृती अभियान राबविण्यात यावे. महापालिकेच्या हद्दीतील मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी संबंधितांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments