१ जानेवारी,
सेलिब्रिटी शेफ ते फिल्ममेकर असा प्रवास करणाऱ्या विकास खन्ना यांचा पहिलाच सिनेमा द लास्ट कलरला ऑस्कर पुरस्कारातील फीचर फिल्मच्या यादीत नामांकन मिळालं. स्वतः विकास यांनी सोशल मीडियावर याची माहिती दिली. पहिल्याच सिनेमाला ऑस्करमध्ये नामांकन मिळाल्यामुळे सध्या विकास खन्ना फार आनंदी आहे.
BEST WAY TO START 2020. MIRACLE. MIRACLE. Thank you UNIVERSE. Our humble film THE LAST COLOR is pure HEART.
Oscars: Academy Announces 344 Films Eligible for 2019 Best Picture. https://t.co/p654zVd8IQ pic.twitter.com/3i4NzIkL44
— Vikas Khanna (@TheVikasKhanna) January 1, 2020
विकासने आपल्या ट्विटरवर लिहिले की, ‘२०२० ची सर्वात चांगली सुरुवात. जादू.. ऑस्कर अकादमीने २०१९ मधील सर्वोत्तम ३४४ सिनेमांची घोषणा केली. यात द लास्ट कलर सिनेमाचा समावेश आहे. साऱ्यांना धन्यवाद.’ लास्ट कलर सिनेमातील अभिनेत्री नीना गुप्ता यांनी विकास यांच्या ट्वीटला रीट्वीट करत म्हटलं की, ‘माझा विश्वास बसत नाहीये. मी खूप आनंदी आहे.