Saturday, March 22, 2025
Homeताजी बातमीबिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात होण्यापूर्वीचा व्हिडिओ आला समोर; हवाई दलाने ब्लॅक...

बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात होण्यापूर्वीचा व्हिडिओ आला समोर; हवाई दलाने ब्लॅक बॉक्स घेतला ताब्यात…

तामिळनाडूतील कुन्नूर येथे झालेल्या अपघातात बळी पडलेल्या सीडीएस रावत यांच्या हेलिकॉप्टरचा पहिला व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये हेलिकॉप्टर पाहून लोक पळताना दिसत आहेत. सीडीएस रावत आणि त्यांच्या पत्नीसह अन्य ११ जणांना घेऊन जाणाऱ्या एमआय-१७ हेलिकॉप्टरचा हा व्हिडिओ क्रॅश होण्याच्या काही वेळापूर्वीचा सांगण्यात येत आहे. बुधवारी हे हेलिकॉप्टर कुन्नूरवरून उड्डाण करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. काही काळ हे हेलिकॉप्टर व्हिडिओमध्ये दिसते आणि नंतर गायब होते. व्हिडिओमध्ये हेलिकॉप्टरचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो.

हेलिकॉप्टर हवेत उडत असल्याचा आवाज ऐकून लोक धावत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. लोक वारंवार हेलिकॉप्टरकडे पाहत आहेत आणि नंतर त्याच दिशेने धावत असल्याचे दिसून येत आहे. आवाज ऐकून हेलिकॉप्टरच्या दिशेने धावणाऱ्यांमध्ये एक तरुण आणि चार महिला दिसत आहेत. काही वेळ हेलिकॉप्टर पाहून हे लोक त्या दिशेने धावतात आणि नंतर हेलिकॉप्टर त्यांच्या नजरेसमोरून निघून जाते.

दरम्यान, कुन्नूरजवळ क्रॅश झालेल्या भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे. हेलिकॉप्टरचा फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आला आहे.

जनरल बिपीन रावत हे ‘एमआय-१७ व्ही५’ हेलिकॉप्टरने तमिळनाडूतील वेलिंग्टन येथील संरक्षण दलाच्या महाविद्यालयातील (डीएसएससी) कार्यक्रमासाठी जात असताना हा भीषण अपघात झाला. या हेलिकॉप्टरमध्ये रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासह १४ जण होते. कोईम्बतूरजवळील सुलूर हवाई तळावरून सकाळी ११.४८ वाजता उड्डाण घेतलेले हे हेलिकॉप्टर पाऊण तासात वेलिंग्टन येथे पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, उड्डाणानंतर काही वेळातच (१२.२२ वाजता) ते निलगिरी जिल्ह्यातील कट्टेरी-नांचपंचथ्राम येथे कोसळले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments