Thursday, May 15, 2025
Homeताजी बातमीVIDEO: मुंबईत भीषण अग्नितांडव, मानखुर्दमध्ये गोडाऊनला आग

VIDEO: मुंबईत भीषण अग्नितांडव, मानखुर्दमध्ये गोडाऊनला आग

मुंबईतील मानखुर्द येथील मंडाळे स्क्रॅप गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

या दुर्घटनेत अद्याप कोणताही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, आगीची तीव्रता भीषण आहे. धुराचे लोट दूरपर्यंत दिसून येत आहे.

या गोदामात भंगाराची दुकानं आहे. त्यामुळे काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले आहे. आगीत अनेक दुकानं भक्ष्यस्थानी सापडल्याचे वृत्त आहे.

गोदामाच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीमध्ये आगीमुळे खळबळ उडाली आहे. स्थानिकांनी आग विझवण्यासाठी पाण्याचा मारा केला, पण यात त्यांना यश आले नाही.

आगी माहिती तातडीने अग्निशमन दलाला देण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. आग विझवण्याचे युद्ध पातळीवर काम सुरू आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments