15 November 2020.
ज्येष्ठ अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचं निधन झालं. कोव्हिडशी निगडीत गुंतागुंतीमुळे त्यांचा मृत्यू झाला. ते 85 वर्षांचं होते.
सौमित्र चटर्जी हे एक भारतीय चित्रपट अभिनेते होते. ते ऑस्करविजेत्या चित्रपटाचे दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या सहकार्यामुळे परिचित होते ज्यांच्या सोबत त्यांनी चौदा चित्रपटांमध्ये काम केले होते.
सौमित्र चटर्जी यांना फ्रान्सचा कलाकारांचा सर्वोच्च पुरस्कार, ऑर्ड्रे देस आर्ट्स एट देस लेट्रेस पुरस्काराचे ते विजेते होते. सिनेमासाठी भारताचा सर्वोच्च पुरस्कार असलेल्या दादासाहेब फाळके पुरस्काराचेही ते विजेते होते.
काही दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. ती निगेटिव्ह आली. मात्र त्यांची प्रकृती ढासळली. त्यांना हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.