Wednesday, May 14, 2025
Homeआंतरराष्ट्रीयVaccine : ब्रिटनमध्ये १२-१५ वर्षे वयोगटाच्या लसीकरणाचा निर्णय

Vaccine : ब्रिटनमध्ये १२-१५ वर्षे वयोगटाच्या लसीकरणाचा निर्णय

लंडन : ब्रिटनमध्ये १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी फायझर/बायोएनटेकच्या लसीला ब्रिटनच्या औषध नियामकांनी मान्यता दिली आहे. या वयोगटासाठी ही लस सुरक्षित असून त्याचे धोक्यापेक्षा फायदेच अधिक आहेत, असे नियामकांनी म्हटले आहे. युरोपीय समुदायाच्या औषध नियामकांनी या लसीला त्यापूर्वी मान्यता दिली होती.

या वयोगटातील मुलांसाठी ही लस सुरक्षित आहे का याचा आढावा घेण्यात आल्यानंतर त्याला मान्यता देण्यात आली, असे औषधे आणि आरोग्यविषयक उत्पादने नियामक यंत्रणेने म्हटले आहे.

अमेरिकेतही फायझरच्या लसीला मान्यता देण्यात आली असून तेथे १२-१५ वयोगटासाठी लसीकरण सुरू आहे. अनेक देशांनी १२-१५ वयोगटासाठी लसीला मान्यता दिली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments