५ एप्रिल २०२१,
राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढत होत आहे. या पार्श्वभूमीवर तरुणांच्या कोरोना लसीकरणाची ताबडतोब व्यवस्था करा, अशी मागणी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे. भारत हा तरुणांचा देश ओळखला जातो. त्यामुळे १८ ते ३५ या वयातील तरुण पिढीचे कोरोना लसीकरण करा, असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
जगभरात भारत हा तरुणांचा देश आहे अशी आपली ओळख आहे. या कोरोना संक्रमण काळात कोरोनाची लागण तरुणांना जास्त होताना दिसतं आहेत. त्यामुळे १८ ते ३५ वयोगटातील तरुणांना ताबडतोब लसीकरणाची व्यवस्था करावी, अशी विनंती जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
त्याशिवाय पत्रकारांना लसीकरणाची व्यवस्था व्हावी. या मागणीला मा. मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक पाठिंबा दिला असून लवकरच त्याची घोषणा करतो असे त्यांनी आता भ्रमणध्वनीवर मला सांगितले आहे. मुख्यमंत्री हे करतील यावर माझा विश्वास आहे., असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
आज आपल्या एका पत्रकार मित्राचे कोरोनामुळे निधन झाले.मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो कि, राज्यातील जेवढे पत्रकार आहेत जे संकटाला सामोरे जाऊन आपल्याला माहिती देत असतात, समाजाला जागृत ठेवत असतात. त्यांना लस देणे जरुरीचे आहे. त्यांची ही मागणी आपण ताबडतोब मान्य करावी, असेही त्यांनी ट्वीट करत सांगितले.