उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी राजीनामा दिला आहे. उत्तराखंडचे राज्यपाल बेबी राणी मौर्य यांची भेट घेऊन, रावत यांनी आपला राजीनामा त्यांना सादर केला. उत्तराखंड विधनासभा निवडणुकीअगोदर भाजपामध्ये मोठी राजकीय उलाथापालथ पाहायला मिळत आहे. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या सोबत पार पडलेल्या दोन बैठकांनंतर आज (मंगळवार) मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी अखेर आपला राजीनामा दिला.
मुख्यमंत्री रावत यांनी सोमवारी भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांची त्याच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. या भेटीअगोदर त्यांनी राज्यसभा सदस्य अनिल बलूनी यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यानंतर नड्डांसोबत त्याची जवळपास ४० मिनिटं चर्चा झाली.


