१९ डिसेंबर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये मंजूर झाला आहे. आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी ट्रंप यांच्यावर महाभियोग चालवावा की नाही यावर मतदान झालं त्यात डेमोक्रेटिक पक्षाच्या 229 लोकप्रतिनिधींनी प्रस्तावाच्या बाजूने मत दिलं तर डोनाल्ड ट्रंप यांच्या 197 प्रतिनिधींनी त्यांच्यावर महाभियोग चालू नये असा कौल दिला. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये डेमोक्रॅट्सचं बहुमत आहे.
आता हा प्रस्ताव सिनेटमध्ये जाणार असून तिथं ट्रंप यांच्या पक्षाचं बहुमत आहे. त्यामुळे हा प्रस्ताव तेथे मंजूर होण्याची शक्यता कमी आहे.अमेरिकेच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला महाभियोगाच्या प्रक्रियेद्वारे हटवण्यात आलेलं नाही. आतापर्यंत फक्त दोनच राष्ट्राध्यक्षांना महाभियोगाला सामोरं जावं लागलं आहे.
As the U.S. House impeaches Donald Trump, Speaker Nancy Pelosi says Dec. 18 is a great day for the U.S. Constitution but a sad one for America. More here: https://t.co/uCefWpo0PU pic.twitter.com/bbqhXETWy7
— Reuters (@Reuters) December 19, 2019