आपल्या फॅशनने लोकांचा रोष ओढवून घेणाऱ्या उर्फीनं बॉलिवूड सेलिब्रिटी ते मोठमोठे फॅशन डिझायनर यांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं. आता उर्फी बॉलिवूडमध्ये एंट्री घेणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
‘बिग बॉस ओटीटी’मधून लोकप्रियता मिळवणाऱ्या उर्फी जावेदने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. आपल्या अतरंगी फॅशनमुळं उर्फी चर्चेत असते. कधी उर्फीचा फॅशन सेन्स लोकांना आवडतो, तर कधी ती ट्रोलच्या निशाण्यावर येते पण त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात ती मागे राहिली नाही. सोशल मीडिया सेन्सेशन आणि टेलिव्हिजन अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या बिनधास्त शैलीसाठी लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. पण तिच्या वक्तव्यांमुळे ती वादात देखील सापडते. आपल्या फॅशनने लोकांचा रोष ओढवून घेणाऱ्या उर्फीनं बॉलिवूड सेलिब्रिटी ते मोठमोठे फॅशन डिझायनर यांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं. आता उर्फी बॉलिवूडमध्ये एंट्री घेणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
काही दिवसांपूर्वीच एकता कपूरनं तिच्या नव्या सिनेमाची घोषणा केली होती. ‘एलएसडी 2’ असं या चित्रपटाचं नाव होतं. आता उर्फीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘बिग बॉस ओटीटी’मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली उर्फी आता तिच्या बॉलिवूड पदार्पणाची तयारी करत आहे. तिला एलएसडी २ या चित्रपटात मुख्य भूमिकेची ऑफर देण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, उर्फी व्यतिरिक्त या चित्रपटात ‘बिग बॉस 16’ फेम अभिनेत्री निमृत कौर अहलुवालिया देखील दिसणार आहे. एकता टास्क घेऊन बिग बॉसच्या घरात पोहोचली तेव्हा शोदरम्यानच निमृतला या चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. या चित्रपटासाठी चित्रपट निर्मात्यांनी उर्फीशी संपर्क साधल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या अभिनेत्रीने या प्रतिक्रियेत काय म्हटले आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.