Monday, May 11, 2026
Homeताजी बातमीलवळे येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त ‘वीर येलजी शंकर गोठे’ पुस्तक...

लवळे येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त ‘वीर येलजी शंकर गोठे’ पुस्तक व अधिकृत छायाचित्राचे अनावरण

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लवळे येथे गावातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या सोहळ्यात ‘वीर येलजी शंकर गोठे’ या पुस्तकाचे प्रकाशन तसेच येलजी गोठे यांच्या अधिकृत छायाचित्राचे अनावरण करण्यात आले.

या पुस्तकाचे लेखन शेखर गोठे यांनी केले असून, त्यांच्या सखोल संशोधन व ऐतिहासिक अभ्यासातून हे पुस्तक साकारले आहे. पुस्तक प्रकाशनावेळी लेखक शेखर गोठे यांनी निर्मितीमागील प्रेरणा, संशोधनाची प्रक्रिया आणि वीर येलजी गोठे यांच्या साहसगाथेचे महत्त्व उपस्थितांसमोर मांडले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कार्यसम्राट आमदार शंकरभाऊ मांडेकर होते. त्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन व अधिकृत छायाचित्राचे अनावरण झाले. यावेळी श्री. बाळासाहेब चांदेरे (अध्यक्ष, शिवसेना पुणे), श्री. अनिल सौंदडे (विश्वस्त, जेजुरी देवस्थान), श्री. अमोल गोरखेश्री. अविनाश कांबीकर ( पत्रकार, दिग्दर्शक ), श्री. रणजित राऊत (सरपंच, लवळे), श्री. संपत राऊत (पोलीस पाटील) श्री .धनंजय भिसे (मातंग साहित्य परिषद) श्री. शंकर भाऊ तडाखे , श्री. भास्कर नेटके , उषाताई नेटके , श्री. अनिल हातागळे आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच महिला बचत गटाच्या अध्यक्षा, युवक मंडळ प्रमुख आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी यांनीही कार्यक्रमाची शोभा वाढवली. सोहळ्याची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली, त्यानंतर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा आढावा घेण्यात आला.

गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि लहान मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला. उपस्थितांनी अशा उपक्रमांमुळे इतिहास पुढील पिढ्यांसाठी जिवंत राहतो, असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राजेश मारणे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. योगेश जाधव यांनी केले. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments