मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- आरपीआय- मनसे- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज (दि.1 मे) रोजी पिंपरी येथे जाहीर सभा घेणारआहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या शेजारील मैदानावर आज संध्याकाळी पाच वाजता आठवले यांची सभा होणार आहे. या सभेला महायुतीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.