Tuesday, February 27, 2024
Homeअर्थविश्वकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण बजेटमधून अर्थव्यवस्थाला बुस्टर डोस देणार… ?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण बजेटमधून अर्थव्यवस्थाला बुस्टर डोस देणार… ?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यंदाचं अर्थसंकल्प १ फेब्रुवारी म्हणजेच आज सादर करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे अर्थसंकल्पीय अधिवेशन महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे. कोरोना संसर्गाच्या काळातील हा दुसरा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे यंदाही आरोग्य क्षेत्रासाठी अधिक तरतूद राहण्याची शक्यता आहे. यंदाचा अर्थसंकल्पपूर्णपणे डिजिटल असणार आहे. हरितक्रांतीला चालना देण्यासाठी यंदा हरित अर्थसंकल्पाची कल्पना राबवली जाणार आहे. त्यामुळे अर्थमंत्र्यांचा पोतडीतून काय निघणार असं बोलण्याऐवजी त्यांचा टॅबमधून कुठल्या क्षेत्रासाठी काय तरतूद असणार आहे हे पाहावं लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थंसकल्पीय अधिवेशनाकडे जगाच्या नजरा लागल्या असल्याचं म्हटलं आहे. निर्मला सितारमण यंदाच्या अर्थसंकल्पात आत्मनिर्भर भारत अभियानाला प्राधान्य देण्याची शक्यता आहे. नोकरदार,उद्योजक, शेतकरी, आरोग्य क्षेत्रासाठी अर्थसंकल्प कसा राहणार हे पाहायला लागणार आहे.

मागच्या वर्षीप्रमाणे यंदाचाही अर्थसंकल्प कागदविरहीत म्हणजे ‘डिजिटल’ असेल. सितारामन यांचा हा चौथा अर्थसंकल्प असेल. सितारामन यांची आधीची दोन अर्थसंकल्पीय भाषण दोन तासांपेक्षा जास्त चालली होती. २०१९ मध्ये आपला पहिला अर्थसंकल्प मांडताना त्यांनी १३५ मिनिटे भाषण केल, तर २०२० मध्ये त्यांनी विक्रमी १६२ मिनिट भाषण केल. सीतारामन यांनी मागच्या अर्थसंकल्पातही अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या होत्या; पण त्यातील अनेक घोषणा अपूर्ण राहिल्या. सन २०२२पर्यंत निर्गुंतवणुकीतून पावणेदोन लाख कोटी रुपये गोळा करण्याचे अर्थसंकल्पीय लक्ष्य अद्याप पूर्ण झालेल नाही. तर कोरोना संकटामुळ दोन वर्षांपासून निर्माण झालेल्या महागाई आणि बेरोजगारीसारख्या आव्हानांना सामोरे जाण्याचाही सीतारामन यांचा प्रयत्न असेल.

अर्थसंकल्पामध्ये पाच राज्यांच्या निवडणुकांचा प्रभाव राहणार… ?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपला सलग चौथा अर्थसंकल्प आज लोकसभेत सकाळी ११ वाजता मांडतील. विधानसभा निवडणुका होत असलेल्या उत्तर प्रदेश आणि पंजाबसह पाच राज्यांतील शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी सीतारामन या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने एक लाखापर्यंत कर्ज देण्याची घोषणा करतील, अशी चर्चा आहे. त्याचबरोबर अनेक कल्याणकारी योजनांचाही या अर्थसंकल्पात सूतोवाच होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments