Friday, July 19, 2024
Homeमहाराष्ट्रदिव्यांग कल्याणकारी योजने अंतर्गत “हयातीचा दाखला” चे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार

दिव्यांग कल्याणकारी योजने अंतर्गत “हयातीचा दाखला” चे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभाग दिव्यांग कक्षाच्या वतीने विविध दिव्यांग कल्याणकारी योजना राबविणेत येतात. या योजना अंतर्गत दि.२६/१२/२०२३ पासून ६० दिवसापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील विविध दिव्यांग योजनांचा लाभ घेणा-या दिव्यांग व्यक्तींचा “हयातीचा दाखल्या” बाबत त्यांचे घरोघरी जाऊन समक्ष सर्वेक्षण करणेत येणार आहे.

हे सर्वेक्षण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे लाभ घेणा-या व नोंदणीकृत असलेल्या मनपा हद्दीतील दिव्यांग व्यक्तींचे घरोघरी जाऊन अक्षांश व रेखांश वर (Latitude and longitude) नोंदी घेवून तसेच गुगल टॅगिंग नुसार करणेत येणार आहे. यामध्ये दिव्यांग व्यक्तींचे फेस रिडींग, थंम्ब इंम्ब्रेशन व आयरीस ओळख [Eyes] मार्फत ऑनलाईन नोंद घेणेत येणार असून तसेच त्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र / आधार कार्ड, UDID कार्ड, मतदान कार्ड इ. स्कॅन करून ऑनलाईन वर अपडेट करणेत येणार आहे. लाभार्थ्यांचे नाव व पत्ता आधार नंबर, मोबाईल नंबर तसेच पालकांचे पुर्ण नाव, पत्ता व आधार नंबर, मोबाईल नंबर याच्या नोंदी घेवून या नुसार सर्वेक्षण करणेत येणार आहे.

ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचा राहण्याचा पत्ता, मोबाईल नंबर बदलेला असेल अश्या लाभार्थ्यांनी तात्काळ योग्य त्या पुराव्यासह लेखी अर्ज मुख्य कार्यालयात सादर करावा.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील महानगरपालिकेकडे विविध योजनेत लाभ घेणारे दिव्यांग नागरीक यांना आवाहन करणेत येते की, हयातीचा दाखला सर्वेक्षण बाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मे.अल्टवाईज प्रा.लि. या संस्थेची नेमणूक केलेली असून संस्थेचे ओळखपत्र धारक सर्वेअर हे शहरातील महानगरपालिकेकडे विविध योजनेत लाभ घेणारे दिव्यांग नागरीकांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत. त्यांना दिव्यांग नागरीकांनी सर्वोतोपरी सहकार्य करावे.

संबंधित सर्व दिव्यांग नागरीकांनी आपले मुळ आधारकार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, UDID कार्ड, लाभार्थ्यांचा मतदान कार्ड (वय वर्ष १८ पुढील) तसेच पालकांचे मतदान कार्ड, राहण्याचा पत्ता पुरावा, मोबाईल नंबर इ. कागदपत्रे सर्वेक्षण वेळी उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे.

दिव्यांग नागरीकांनी हयातीचा दाखल्या बाबत होणा-या सर्वेक्षणाला महानगरपालिकेला सहकार्य करावे तसेच काही अडचणी असल्यास मो.नं.8459834929 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन समाज विकास विभाग, दिव्यांग कक्षाच्या वतीने श्री. श्रीनिवास दांगट, सहा. आयुक्त, (दिव्यांग कक्ष) समाज विकास विभाग यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments