Wednesday, July 15, 2026
Homeक्रिडाविश्व१२ वर्षाखालील मुलांच्या “व्हेरॉक कप” क्रिकेट स्पर्धेचे दि. २३ फेब्रुवारी ते ४...

१२ वर्षाखालील मुलांच्या “व्हेरॉक कप” क्रिकेट स्पर्धेचे दि. २३ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२२ दरम्यान आयोजन..

सालाबादप्रमाणे पीसीएमसीज व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या वतीने युवा खेळाडूंना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टिकोनातून १२ वर्षाखालील मुलांच्या “व्हेरॉक कप” क्रिकेट स्पर्धेचे २३ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२२ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेत यजमान वेंगसरकर अकॅडमीच्या दोन संघासह एच के बाऊन्स अकॅडमी, आर्यन्स क्रिकेट अकॅडमी, फ्रेंड्स क्रिकेट अकॅडमी, वीरांगण क्रिकेट अकॅडमी, स्पोर्टिव्ह क्रिकेट अकॅडमी, ऑल स्टार्स क्रिकेट अकॅडमी, नाऊ फिट क्रिकेटअकॅडमी, महेंद्र गोखलेज अकॅडमी, चंद्रोस क्रिकेट अकॅडमी, स्पोर्ट्स पार्क क्रिकेट अकॅडमी अशा नामांकित बारा संघांना निमंत्रित करण्यात आले आहे.

सुरुवातीला चार गटात साखळी सामने होतील व गुणानुक्रमे चार अव्वल संघांमध्ये ३ मार्च रोजी दोन उपांत्य सामने होतील. अंतिम सामना ४ मार्च रोजी होईल. थेरगाव येथील मैदानावर २३ फेब्रुवारी रोजी स्पर्धेचे उदघाटन होईल. स्पर्धेतील सर्व सामने थेरगाव येथे होतील. प्रत्येक सामना २५ षटकांचा असेल. प्रत्येक सामन्यातील सामनावीरांना व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक व स्पर्धेतील मालिकावीर ठरलेल्या खेळाडूंना तसेच उपविजेता व विजेत्या संघाला चषक देऊन गौरविण्यात येईल. पारितोषिक वितरण ४ मार्च रोजी भारतीय संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर ह्यांचे शुभहस्ते होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments