Sunday, August 16, 2026
Homeताजी बातमीपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १० प्रभाग समिती सभापतींची बिनविरोध निवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १० प्रभाग समिती सभापतींची बिनविरोध निवड

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात आज १० प्रभाग समिती सभापती पदांच्या निवडणुका शांततेत पार पडल्या. प्रत्येक प्रभागातून केवळ एकच उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने सर्वच १० प्रभाग समिती सभापतींची बिनविरोध निवड झाली.

विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (भा.प्र.से.) प्रजित नायर यांनी पीठासीन अधिकारी म्हणून निवडणूक प्रक्रिया पार पाडली.

जाहीर करण्यात आलेल्या निकालानुसार ‘अ’ राजगड प्रभाग समितीच्या सभापतीपदी अर्चना करांडे, ‘ब’ सिंहगड प्रभाग समितीच्या सभापतीपदी मंदार देशपांडे, ‘क’ विजयदुर्ग प्रभाग समितीच्या सभापतीपदी निखिल बोऱ्हाडे, ‘ड’ देवगिरी प्रभाग समितीच्या सभापतीपदी सविता खुळे, ‘इ’ शिवनेरी प्रभाग समितीच्या सभापतीपदी अर्चना सस्ते, ‘फ’ तोरणा प्रभाग समितीच्या सभापतीपदी शिवानी नरळे, ‘ग’ पुरंदर प्रभाग समितीच्या सभापतीपदी मनिषा पवार, ‘ह’ प्रतापगड प्रभाग समितीच्या सभापतीपदी तृप्ती कांबळे, ‘ज’ रायगड प्रभाग समितीच्या सभापतीपदी आरती चोंधे आणि ‘ल’ लोहगड प्रभाग समितीच्या सभापतीपदी रेखा देवकर यांची बिनविरोध निवड अधिकृतपणे जाहीर करण्यात आली.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान नगरसचिव उल्हास जगताप, मुकेश कोळप, विशेष अधिकारी किरण गायकवाड, प्रभाग अधिकारी निवेदिता घार्गे, गोरक्षनाथ लिमण, अजिंक्य येळे, अश्विनी गायकवाड, परशुराम वाघमोडे, अतुल पाटील, पूजा दूधनाळे, डी.डी. कांबळे, संतोष कोराड तसेच नगरसचिव विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कामकाजाची जबाबदारी सांभाळली. निवडणूक प्रक्रियेचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नव्याने निवडून आलेल्या प्रभाग समिती सभापतींनी महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर तसेच महापालिकेतील पदाधिकारी आणि नगरसदस्यांची भेट घेऊन शुभेच्छा स्वीकारल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments