Monday, May 12, 2025
Homeताजी बातमीUGC: सीए, सीएस, आयसीडब्ल्यूए पदव्युत्तर पदवीला समकक्ष, पीएच.डी. साठी पात्र

UGC: सीए, सीएस, आयसीडब्ल्यूए पदव्युत्तर पदवीला समकक्ष, पीएच.डी. साठी पात्र

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) कंपनी सचिव (सीएस), सनदी लेखापाल (सीए) आणि कॉस्ट अकाउंटंट या अभ्यासक्रमांना पदव्युत्तर पदवी समकक्षता दिली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घ्यायचे आहे त्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे. सदर अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेले उमेदवार आता नेट परीक्षेसाठी पात्र ठरतील, पीएच.डी. करू शकतील, तसेच शिक्षणासाठी परदेशी जायचे असल्यास त्यासाठीही फायदा होऊ शकणार आहे.

यूजीसीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या तीन अभ्यासक्रमांना पदव्युत्तर पदवीची समकक्षता देण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याचे परिपत्रक यूजीसीने प्रसिद्ध केले आहे. जगभरात कंपनी सचिव, सनदी लेखापाल आणि कॉस्ट अकाउंटंट ही पात्रता पदव्युत्तर पदवीच्या समकक्ष मानली जाते. मात्र आतापर्यंत या अभ्यासक्रमांना पदव्युत्तर पदवीची समकक्षता नव्हती. त्यामुळे ही समकक्षता मिळण्यासाठी गेली काही वर्षे मागणी करण्यात येत होती.

सनदी लेखापालांची नियामक संस्था आयसीएआय, कंपनी सचिवांची नियामक संस्था आयसीएसआय आणि कॉस्ट अकाउंटंट्सची नियामक संस्था आयसीडब्ल्यूएआय यांनी ही समक्षकता मिळण्यासाठी यूजीसी आणि सरकारकडे पाठपुरावाही केला. या पार्श्वभूमीवर यूजीसीकडून या तीनही अभ्यासक्रमांना पदव्युत्तर पदवीची समक्षकता देण्याचा निर्णय घेण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments