Tuesday, March 18, 2025
Homeताजी बातमीलॉकडाउनविरोधात उदयनराजेंचं साताऱ्यात ‘भीक मागो आंदोलन’!

लॉकडाउनविरोधात उदयनराजेंचं साताऱ्यात ‘भीक मागो आंदोलन’!

राज्य सरकारच्या लॉकडाउन विरोधात भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (शनिवार) दुपारी सातारा येथील पोवाईनाका येथे आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करत त्यासमोरील झाडाखाली पोतं टाकून त्यावर बसत भीक मागो आंदोलन केले. या आंदोलनामुळे साताऱ्यातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

साताऱ्यात पोवई नाक्यावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंब्याच्या झाडाखाली पोत्यावर बसत टाळेबंदीच्या विरोधात हातात थाळी घेऊन उदयनराजेंनी भीक मागो आंदोलन केले. त्यांनी टाळेबंदीला तीव्र विरोध दर्शविला आहे .

यावेळी उद्यापासून नो लॉकडाउन म्हणत ”आज जर राजेशाही असती तर पैसे खाणाऱ्या सगळ्यांना मी हत्तीच्या पायाखाली तुडवल असतं” असं उदयनराजेंनी बोलून दाखवलं. उदयनराजे यांनी सचीन वाझे प्रकरणासह इतर सर्वच विषयांवर राज्यसरकारवर टीका केली.

यावेळी उदयनराजेंनी सांगितले की, ही टाळेबंदी आम्हाला नको आहे. आमची जनता काय उपाशी मरणार का? जर पोलिसांना जनतेचा उद्रेक पाहावा लागला तर त्याला जबाबदार प्रशासन राहील, असा इशाराही उदयनराजेंनी दिला. यानंतर उदयनराजेंनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत फेरफटका मारत शासनाच्या कारभाराचाही निषेधही नोंदवला. तसेच, उद्यापासून नो लॉकडाउन असे देखील उदयनराजेंनी आपल्या स्टाईल बोलून दाखवले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments