उच्च श्रेणीतील क्रिकेट खेळण्यासाठी आवश्यक तंत्रकौशल्याबरोबर सर्वोत्तम तंदुरुस्ती वाढविण्यासाठी हीच योग्य वेळ आणि वय असल्याचे प्रतिपादन U19 वूमेन्स व्हेरॉक कप 2021 च्या पारितोषिक वितरण समारंभात खेळाडूंना मार्गदर्शन करताना भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी केले. यावेळी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गुणगौरव केला.
ह्या वेळी समारंभास प्रमुख पाहुणे पिं चिं मनपा शहर अभियंता राजन पाटील,महाराष्ट्राचे माजी कर्णधार मिलिंद गुंजाळ आणि माजी वेगवान गोलंदाज मिलिंद कुलकर्णी, व अकॅडमीचे प्रशिक्षक चंदन गंगावणे,मोहन जाधव,भूषण सुर्यवंशी आणि डॉ. विजय पाटील उपस्थित होते.
अंतिम सामना वॉरियर्स क्रिकेट अकॅडमी विजयी विरुद्ध व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी यांच्यामध्ये झाला.यावेळी अंतिम सामनावीर संजना वाघमोडे वॉरियर्स अकॅडमीची खेळाडू ठरली. तसेच स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज सुहानी कहांडळ वेंगसरकर अकॅडमी, सर्वोत्तम गोलंदाज स्वांजली मुळे वेंगसरकर अकॅडमी,सर्वोत्तम क्षेत्ररक्षक तेजस पोळ वॉरियर्स अकॅडमी, स्पर्धेची सर्वोत्तम मानकरी खेळाडू समृद्धी बनवणे वॉरियर्स अकॅडमी ठरली.