पिंपरी, ता.2 : U-12 व्हेरॉक कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमीला विजेतेपद मिळाले. स्पर्धेच्या अंतिम सामना हा आर्यन्स क्रिकेट अकॅडमी विरूद्ध व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी असा खेळवण्यात आला. अंतिम सामनावीर म्हणून अर्जुन माहुली तर सर्वोत्तम फलंदाज अद्विक तिवारी, सर्वोत्तम गोलंदाज अथर्व काळे, सर्वोत्तम क्षेत्ररक्षक शौनक शेवडे, स्पर्धेचा सर्वोत्तम मानकरी खेळाडू अद्विक तिवारी ठरला आहे.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण महाराष्ट्राचे माजी कर्णधार मिलिंद गुंजाळ ह्यांच्या हस्ते व भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर ह्यांचे उपस्थितीत पार पडले.
यावेळी दिलीप वेंगसरकर म्हणाले की, खेळाडूंनी सातत्य राखण्याबरोबरच आपल्या खेळात सतत सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील राहून अधिक खडतर परिश्रम घेऊन शारीरिक क्षमता वाढवून तंदुरुस्ती बरोबरच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणेही गरजेचे आहे, कारण क्षेत्ररक्षणाच्या जोरावर सुद्धा सामन्यात कलाटणी देता येते.
प्रमुख पाहुणे मिलिंद गुंजाळ म्हणाले की, खेळाडूंना यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम घेणे गरजेचे आहे. समारंभास अकॅडमीचे प्रशिक्षक शादाब शेख, मोहन जाधव, भुषण सूर्यवंशी आणि डॉ. विजय पाटील उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय पाटील ह्यांनी केले.