Tuesday, February 27, 2024
Homeसंपादकीयदोन अज्ञात संसदेत घुसले, कामकाजादरम्यान खासदारांच्या बाकांवरून उड्या, पिवळा धूर अन्…, नेमकं...

दोन अज्ञात संसदेत घुसले, कामकाजादरम्यान खासदारांच्या बाकांवरून उड्या, पिवळा धूर अन्…, नेमकं काय घडलं?

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असून आज लोकसभेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. संसदेचं कामकाज सुरू असताना दोन अज्ञात इसम सभागृहात शिरले. प्रेक्षक गॅलरीतून हे दोघे सभागृहात आले. सुरक्षा व्यवस्था भेदून दोन जण सभागृहात शिरले आणि खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धावत होते. यावेळी पिठासीन अध्यक्षांनी या तिघांना पकडण्यास सांगितलं. काही खासदार या तिघांना पकडण्यासाठी धावले. दरम्यान, पिठासीन राजेंद्र अग्रवाल यांनी लोकसभा दोन वाजेपर्यंत स्थगित केली आहे.

हा गोंधळ पाहून सर्व खासदार सभागृहाबाहेर पडले. ठाकरे गटातील खासदार अरविंद सावंतही बाहेर आले आणि त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी सावंत यांनी सभागृहात घडलेल्या घटनेची माहिती दिली. सावंत म्हणाले, लोकसभेचं कामकाज सुरू असताना अचानक दोनजण प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात आले. एका खांबाच्या मदतीने ते खाली प्रेक्षक गॅलरीतून आले. दोघांनी लागोपाठ उड्या मारल्या. मग दोघेही खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत धावत होते. तेवढ्यात त्यातल्या एकाने बूट काढले, तो बूट काढत होता तेव्हा काही खासदारांनी त्याला घेरलं. त्याचप्रमाणे दुसऱ्या इसमालाही पकडलं. त्याचवेळी सभागृहात गॅस पसरू लागला. पिवळ्या रंगाचा गॅस दिसत होता. तो गॅस कसा आला ते माहिती नाही. पण या गॅसमुळे नाकाला आणि डोळ्यांना त्रास होत होता. सुरक्षारक्षकांनी या दोन्ही इसमांना ताब्यात घेतलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments