Monday, December 4, 2023
Homeताजी बातमीपुणे- मुंबई द्रुतगतीमार्गावर दोन ट्रकची भीषण धडक..

पुणे- मुंबई द्रुतगतीमार्गावर दोन ट्रकची भीषण धडक..

मुंबई द्रुतगतीमार्गावरील बोरघाटात भरधाव ट्रक वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरील ट्रकला भीषण धडक दिल्याने अपघात झाला. यात पाठीमागील ट्रक पलटी होऊन तीन जण जखमी झाले. ही घटना पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. काच घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याने मुंबईकडे जाणारी जड वाहतूक दोन तासांसाठी बंद करण्यात आली होती. तर हलक्या वाहनांची वाहतूक जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरून वळवण्यात आली होती. दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, काच घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याने रस्त्यावर काचांचा खच पडल्याचं बघायला मिळालं.

पुणे- मुंबई द्रुतगतीमार्गावर बोरघाटात झालेल्या भीषण अपघातात ट्रकचं मोठं नुकसान झालं असून या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. अपघात पहाटे साडेपाचच्या सुमारास बोरघाट पोलीस चौकी जवळ झाला आहे. अपघातात ट्रकचा चक्काचूर झाला असून यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक दोन तासांसाठी थांबविण्यात आली होती. मुंबई लेनवर काचांचा खच पडला होता.

दरम्यान, अथक प्रयत्नानंतर वाहतूक सुरू करण्यात आली आहे. जखमी तीन जणांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे. अपघात झाल्यानंतर युद्ध पातळीवर ट्रक बाजूला करण्याचं काम सुरू होतं. दोन तासानंतर ट्रक रस्त्याचा बाजूला घेण्यात आला आहे. सुदैवाने यात मोठी जीवितहानी झालेली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments