Thursday, September 28, 2023
Homeताजी बातमीअर्णब गोस्वामीला तुरुंगात असताना मोबाईल वापरायला दिल्याप्रकणी दोन पोलीस कर्मचारी निलंबित.

अर्णब गोस्वामीला तुरुंगात असताना मोबाईल वापरायला दिल्याप्रकणी दोन पोलीस कर्मचारी निलंबित.

13 November 2020.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांची सर्वोच्च न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे. दरम्यान अर्णब गोस्वामी यांना न्यायालयीन कोठडी दरम्यान, मोबाईल वापरायला देणे दोन पोलीस कर्मचाऱ्यांना नोकरीवर बेतले आहे.

तुरुंगात कैद्यांना स्वत:चा मोबाईल वापरण्यास दिल्या प्रकरणी या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.अर्णब गोस्वामी यांना अटक करून अलिबाग येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यानंतर गोस्वामी यांना न्यायालीन कोठडी सुनावण्यात आली होती.


दरम्यान, न्यायालयीन कोठडीसाठी अर्णब गोस्वामी यांची रवानगी अलिबाग येथील शाळेत तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या तुरुंगात करण्यात आली होती. मात्र तिथे असताना अर्णब गोस्वामी हे मोबाईल वापरत असल्याचे त्याचबरोबर सोशल मीडियावर सक्रीय असल्याचे दिसून आले होते.


त्यानंतर या प्रकाराची गंभीर दखल घेत कारागृह प्रशासनाने या प्रकाराची खातेनिहाय चौकशी सुरू केली होती.तसेच तुरुंगात असलेल्या इतर कैद्यांकडेही याबाबत चौकशी करण्यात आली होती. त्यामधून दोन पोलीस कर्मचारी हे पैसे घेऊन कैद्यांना स्वत:चा मोबाईल वापरण्यास देतात, अशी माहिती समोर आली.

त्यानंतर या प्रकरणी सुभेदार अनंत भेरे आणि पोलीस शिपाई सचिन वाडे यांना निलंबित करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments