शहरात आगीमध्ये होरपळून दोघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना मध्यरात्री अडीचच्या सुमारास वाल्हेकरवाडी येथे घडली आहे. ललित अर्जुन चौधरी (वय २१) आणि कमलेश अर्जुन चौधरी (वय २३) या सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. आधी लाकडाच्या वखारीला भीषण आग लागली, मग त्याच्या झळा शेजारील विनायक अल्युमिनियम प्रोफाइल डोअर बसल्याने भीषण आग लागली. आगीत पोटमाळ्यावर झोपलेल्या दोघांचा झोपेतच होरपळून मृत्यू झाला आहे.
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री शहरातील वाल्हेकरवाडी येथे लाकडाच्या वखारीला भीषण आग लागली. याची छळ शेजारील दुकानांना बसल्याने त्याही दुकानांना भीषण आग लागली. शेजारील दुकानात दोन जण झोपले होते, त्यांचा झोपेतच बेशुद्ध होऊन होरपळून मृत्यू झाला आहे. या भीषण आगीत लाकडाची वखार जळून खाक झाली आहे. तसेच एक चारचाकी देखील जळाली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाची ५ वाहनं दाखल झाली होती. तर, अग्निशमन दलाच्या ४० जवानांनी आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत.