Sunday, July 20, 2025
Homeताजी बातमीबार्टी आणि भोसरी येथील प्रीतम प्रकाश महाविद्यालय यांच्यावतीने दोन दिवसीय करिअर मार्गदर्शन...

बार्टी आणि भोसरी येथील प्रीतम प्रकाश महाविद्यालय यांच्यावतीने दोन दिवसीय करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) पुणे व भोसरी इंद्रायणी नगर येथील प्रीतम प्रकाश महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी आणि मंगळवारी दोन दिवसीय करिअर मार्गदर्शन आणि करिअर समुपदेशन या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. इंद्रायणी नगर, भोसरी येथील प्रीतम प्रकाश महाविद्यालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सकाळी ९:३० वा. उद्घाटन होणार आहे.

उद्घाटन प्रसंगी आमदार अमित गोरखे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, बार्टीचे महासंचालक सुनील वारे तसेच राणी पुतळाबाई लॉ कॉलेजच्या ॲड. कोमल साळुंखे, प्रीतम प्रकाश महाविद्यालयाचे प्राचार्य व निमंत्रक डॉ. सदाशिव कांबळे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थान प्रा. डॉ. अशोक कुमार पगारिया भूषविणार आहेत.

उद्घाटनानंतरच्या प्रथम सत्रात नवीन शैक्षणिक धोरण संधी व आव्हाने या विषयावर डॉ. नाथा मोकाटे, प्रा. डॉ. उमा काळे, राजेंद्र धोका हे मार्गदर्शन करणार आहेत. द्वितीय सत्रात स्पर्धा परीक्षेची बदलती गणिते व शिक्षणातील बदलते प्रवाह या विषयावर प्रा. सचिन पवार व प्रा. लक्ष्मण पवार, हनुमंत शिंदे हे मार्गदर्शन करणार आहेत. तिसऱ्या सत्रात समाजकार्य क्षेत्रातील संधी या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. यशोधन मिठारे, टीमवीचे विभाग प्रमुख डॉ. प्रकाश यादव तसेच डॉ. विजय निकम मार्गदर्शन करणार आहेत. चौथे सत्रात विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि प्रथमोपचार प्रात्यक्षिके श्रेया सुखणवर, संयोगिता शेकटकर, डॉ. किशोर यादव सादर करतील.

मंगळवारी (दि. २४) समारोपाच्या दिवशी प्रथम सत्रात सकाळी ९:३० वाजता लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील संधी या विषयावर महाराष्ट्र उद्योजकता प्रशिक्षण केंद्राचे राजू टांकसाळे, यशदाचे संशोधन अधिकारी लक्ष्मण पवार; देश परदेशात शैक्षणिक संधी फेलोशिप्स व स्कॉलरशिप या विषयावर डॉ. सतीश नाईक दीपक सोनवणे; मीडिया व जाहिरात क्षेत्रातील संधी या विषयावर मंगेश वाघमारे प्रा. सदाशिव कांबळे आणि वकिली व व्यावसायिक क्षेत्रातील संधी या विषयावर ॲड. रजनी उकिरडे, ॲड. राणी सोनवणे, राणी पुतळाबाई लॉ कॉलेजच्या प्राचार्य शुभा पिल्ले या मार्गदर्शन करणार आहेत.

दुसऱ्या सत्रात करिअर निवडीचा मूलमंत्र शारीरिक व मानसिक स्थिती या विषयावर प्रा. रत्नदीप कांबळे, प्रदीप कदम, विलास पगारिया मार्गदर्शन करतील.
ऑनलाइन व डिजिटल एज्युकेशन क्षेत्रातील संधी या विषयावर भारती विद्यापीठाचे डॉ. विनोद माने व अत्तार जावेद, नरेश गोटे मार्गदर्शन करणार आहेत. भाषा संस्कृती आणि प्रकाशन क्षेत्रातील संधी या विषयावर डॉ. शिवाजी जवळेगेकर, अविनाश काळे, विठ्ठल साठे हे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

समारोपाच्या सत्रात दुपारी ४:३० वाजता आमदार महेश लांडगे व माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ होणार आहे. यावेळी उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे संचालक डॉ. शैलेंद्र देवळणकर, बार्टीचे प्रबंधक इंदिरा अस्वार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू ज्ञानेश्वर विधाटे, बी. बी. वाफारे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती प्रीतम प्रकाश महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सदाशिवराव कांबळे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments