१६ जानेवारी २०२०,
पुणे ग्रामीण LCB टिमने ,पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली मिळालेल्या बातमीनुसार भिगवण पो.स्टे.हद्दीत मौजे पोंदवाडी फाटा, पुणे-सोलापूर रोड लगत ता.इंदापूर जि.पुणे येथून आरोपी -१) राजू विठ्ठल रोकडे वय ३९ वर्षे रा.चिखली, मोरेवस्ती ता.हवेली जि.पुणे मूळ रा.कासळवाडी ता.पाथर्डी जि.अहमदनगर २) अमोल दादासाहेब बोराटे वय २६ वर्षे रा.चिखली, मोरेवस्ती झोपडपट्टी ता.हवेली जि.पुणे मूळ रा.पिंपळगाव आळवा ता.जामखेड जि.अहमदनगर ३) रवि भाऊसाहेब चाळक वय २१ वर्षे रा.दिघी, आदर्शनगर, पुणे.यांना ताब्यात घेवून त्यांचे कब्जातून बेकायदा, विनापरवाना व बेकायदेशीर हेतुस्तव विक्री करणेसाठी बाळगलेले २ गावठी पिस्टल व ४ जिवंत काडतुसे असा एकुण किं.रु. १,००,४०० / – चा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.यातील आरोपी नं.२ अमोल बोराटे याचेवर यापूर्वी खुनाचा प्रयत्न, आर्म अॅक्ट व खंडणी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपींना पुढील कारवाईसाठी भिगवण पो.स्टे.चे ताब्यात दिलेले आहे.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट सो. यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. दत्तात्रय गुंड, पो.हवा. महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, पो.ना. गुरू गायकवाड, सुभाष राऊत, पो कॉ. अक्षय जावळे यांनी केलेली आहे..