महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता बारावीच्या मार्च- एप्रिल २०२२ परीक्षेचे ऑनलाइन हॉलतिकीट सर्वविद्यार्थ्यांना येत्या बुधवारी ९ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी १ वाजल्यापासून कॉलेज लॉगइनमध्ये उपलब्ध होणार आहे. महाविद्यालयांनीहॉलतिकीट डाऊनलोड करून प्रिंट घेऊन विद्यार्थ्यांना द्यायचे आहे.
हॉलतिकीट www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कॉलेज लॉगइन मध्ये डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होतील. यासंदर्भात काहीतांत्रिक अडचण आल्यास कॉलेजांनी विभागीय मंडळाशी संपर्क साधायचा आहे.
हॉलतिकीट देण्यासाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारू नये, असे आवाहन मंडळाने केले आहे. प्रवेशपत्राचीप्रिंट काढून त्यावर प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी घ्यायची आहे.