Monday, May 12, 2025
Homeक्रिडाविश्वकंगनाला ट्विटरचा झटका, आक्षेपार्ह ट्विट हटवले; वाचा सविस्तर

कंगनाला ट्विटरचा झटका, आक्षेपार्ह ट्विट हटवले; वाचा सविस्तर

क्रिकेटपटूंविरोधात आपत्तीजनक ट्विट केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रणौतवर ट्विटरने कारवाई केली आहे. ट्विटरने तिच्या दोन पोस्ट डिलीट केल्या असून सामाजिक तेढ निर्माण होईल, असं ट्विट न करण्याची तंबीही ट्विटरने कंगनाला दिली आहे.

क्रिकेटपटू रोहित शर्मानेही ट्विट करून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्यावर कंगनाने आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. त्यामुळे ट्विटरन कंगनाच्या या ट्विटची दखल घेऊन त्यावर कारवाई केली आहे. ट्विटरने कंगनाच्या दोन्ही पोस्ट डिलीट केल्या आहेत. कंगनाने नियमांचा भंग केल्याचं कारण देत ही कारवाई करण्यात आली आहे. कंगनाने ज्या पद्धतीने भाषेचा वापर केला आहे. ती या प्लॅटफॉर्मसाठी योग्य नाही. आमच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या ट्विट्सवरच आम्ही कारवाई केली आहे, असं ट्विटरने म्हटलं आहे.

या ट्विटमधून कंगनाने म्हटले आहे की, रोहित खूप घाबरला आहे. ते आपलं म्हणणं मांडत आहेत. केंद्र सरकारचं क्रांतीकारक पाऊल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकरी कायद्याविरोधात शेतकरी का असतील? गोंधळ घालणारे लोक दहशतवादी आहेत. त्यांना भीती वाटत आहे. रोहितनेही ते जाणून घ्यावं, असं कंगनाने म्हटलं होतं.

भारत हा एकसंध असून आपण सर्वजण मिळून समस्येवर मार्ग काढणं ही काळाची गरज आहे. आपल्या शेतकऱ्यांचा देशाच्या विकासात महत्वाचा वाटा आहे. देशाच्या भल्यासाठी सर्वजण एकत्रित येऊन त्यांची जबाबदारी पार पाडतील, असं ट्विट रोहित शर्मा यानं केलं होतं.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments