Sunday, June 15, 2025
Homeगुन्हेगारीमुंबई-पुणे महामार्गावर भररस्त्यात ट्रकला भीषण आग

मुंबई-पुणे महामार्गावर भररस्त्यात ट्रकला भीषण आग

७ जुलै २०२१,
मुंबई-पुणे जुन्या राष्ट्रीय मार्गावर एका ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या अपघातग्रस्त ट्रकने इतर तीन ते चार वाहनांना धडक दिल्याने अपघातात काहीजण जखमी झालेत. मुंबई-पुणे मार्गावर बोरघाट उतरुन पनवेलकडे जाणाऱ्या ट्रकला इंदिरा गांधी चौकातील पुलावर अचानक आग लागली. या अपघातामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक संथ गतीने होत आहे.

अपघातग्रस्त ट्रक्सची सर्व चाकं निखळली असून ट्रकमध्ये मोठ्याप्रमाणात सामान असल्याने संपूर्ण ट्रकनेच पेट घेतला. हा ट्रक रस्त्याच्या मधोमध क्षतिग्रस्त झाल्याने वाहतूक बंद करण्यात आलीय. खोपोली अग्निशामन दलाने दोन टँकरच्या मदतीने या ट्रकला लागलेली आग अटोक्यात आणली आहे. ही आग कशी लागली याची सविस्तर माहिती समोर आलेली नसली तरी प्राथमिक अंदाजानुसार या ट्रकची धडक अन्य वाहनाशी झाल्याने ट्रकने पेट घेतल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र सुरक्षा बलातील मोहन बोरसे नावाचा जवानही यामध्ये जखमी झाला आहे.

जखमींना खोपोलीमध्ये नगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. खोपोली पोलीस आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या एकेरी मार्गावरील दोन लेनमधूनच येणारी आणि जाणारी वाहतूक केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments