Friday, September 11, 2026
Homeआरोग्यविषयकमाजी पंतप्रधान भारतरत्न दिवंगत राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन; सद्भावना दिनानिमित्त सामूहिक...

माजी पंतप्रधान भारतरत्न दिवंगत राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन; सद्भावना दिनानिमित्त सामूहिक शपथ

भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न दिवंगत राजीव गांधी यांची जयंती काल (२० ऑगस्ट) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सामूहिक सद्भावना शपथ घेऊन साजरी करण्यात आली. यावेळी महापौर रवि लांडगे यांनी दिवंगत राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देशाची एकता, अखंडता, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी तसेच सर्व धर्म, भाषा आणि समुदायांमध्ये परस्पर आदर व सद्भावना वाढविण्यासाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली. तसेच परस्परांमधील सर्व प्रकारचे मतभेद हिंसाचाराचा अवलंब न करता विचारविनिमय करून संविधानिक मार्गाने सोडविण्याचा संकल्प करण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments