५ जून २०२१,
आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बहुजन समाज पार्टी पिंपरी चिंचवड शहर कमिटीच्या वतीने नेहरूनगर पिंपरी याठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले यावेळी बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश सदस्य राहुल ओव्हाळ, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सुरज गायकवाड पुणे जिल्हा सचिव हरीश डोळस, पिंपरी-चिंचवड शहर सचिव विनोद सरोदे गांधीनगर प्रभाग अध्यक्ष विनोद जाधव, नरेंद्र सोनटक्के, पिंपरी चिंचवड प्रभारी सुरेशभाऊ गायकवाड, पुणे जिल्हा प्रभारी संजय ओव्हाळ, पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष गौतम गायकवाड, शहर कोषाध्यक्ष राहुल मदने, विजय मिसळे, मधुकर इंगळे, सुधाकर फुले, राजेंद्र पवार, चंद्रकांत सोनवणे, सखाराम पगारे, विष्णु सरपते ,शंकर शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बसपा च्या वतीने पिंपळ, वड, कडुनिंब, पीपरण, आदी विविध प्रकारच्या झाडांचे रोपे लावण्यात आले.. बसपा पिंपरी चिंचवड शहर पदाधिकाऱ्यांनी प्रभात फेरी काढून वृक्षारोपण बाबतीत नागरिकांना जनजागृती केली व झाडे लावा झाडे जगवा आणि झाडे वाढवा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या व ऑक्सिजन चे महत्व बाबत जनजागृती करण्यात आली..