पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आयएएस अधिकारी राजेंद्र भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा बदल झाल्यानं त्याची चर्चा सुरु झाली आहे.
विक्रम कुमार यांची मुंबई एमएमआरडी विभागात बदली करण्यात आली आहे. महापालिकेच्या निवडणुका अद्याप प्रलंबित असल्यानं गेल्या दोन वर्षांपासून विक्रम कुमार हे प्रशासक म्हणून भूमिका बजावत होते. महापालिका आयुक्त आणि प्रशासक म्हणून विक्रम कुमार हे गेल्या पावणेचार वर्षांपासून पुणे महापालिकेचं कामकाज पाहिलं. या काळात पालिकेत नगरसेवक नसल्यानं त्यांनी कुठलेही धोरणात्मक निर्णय घेतले नाहीत. आता त्यांच्या जागी राजेंद्र भोसले हे प्रशासकाची भूमिका बजावणार आहेत. त्यांना नागरी प्रशासन हाताळण्याची चांगला अनुभव आहे.