पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांची अहेरी, गडचिरोली येथे उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली आहे. तर, निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांची लातूर येथे उपजिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागातील अधिकार्यांच्या बदल्या भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेवरून करण्यात आल्या आहेत. एका जिल्ह्यात सलग तीन वर्षे काम केल्यानंतर त्या जिल्ह्यातील दुसरीकडे बदली केली जाते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या नियमानुसार उपायुक्त जोशी व सहायक आयुक्त शिंदे यांची अचानक बदली करण्यात आली आहे