Saturday, March 22, 2025
Homeताजी बातमीबहुचर्चित ‘बॉईज ३’चा ट्रेलर प्रदर्शित...! ‘मराठीचा माज बेळगावात नाही दाखवायचा तर कुठे...

बहुचर्चित ‘बॉईज ३’चा ट्रेलर प्रदर्शित…! ‘मराठीचा माज बेळगावात नाही दाखवायचा तर कुठे दाखवायचा’, १६ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला.. !

बॉईज सिरीजने सर्वांचच भरपूर मनोरंजन केले आहे.धैर्य, ढुंग्या आणि कबीर ह्या त्रिकूटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रेम मिळालं. ‘बॉईज’ आणि ‘बॉईज २’ ने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः दंगा घातल्यानंतर ‘बॉईज ३’ काय नवीन हंगामा घेऊन येणार याकडे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. नुकताच ‘बॉईज ३’च्या संपूर्ण टीमच्या उपस्थितीत या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत ‘बॉईज ३’ चे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. विदुला चौगुले, सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतीक लाड यांच्या उत्कृष्ट अभिनयाने रंगलेला हा चित्रपट येत्या १६ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘बॉईज ३’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये हे त्रिकूट आणि विदुला करत असलेल्या प्रवासाची झलक आपल्याला पाहायला मिळाली आहे. लुंगीतलं हे कमाल त्रिकूट दक्षिण दिशेला करत असलेल्या प्रवासाची ही गोष्ट आहे. त्यांच्या या प्रवासात आलेलं विदुला नावाचे वळण कोणत्या ठिकाणी या तिघांना घेऊन जाणार ते चित्रपट पहिल्या नंतरच कळणार. ट्रेलरमधील ‘मराठीचा माज बेळगावात नाही दाखवायचा तर कुठे दाखवायचा’, ‘तुम्हाला तुमच्या भाषेचा माज दाखवता येतो तर आम्हाला आमच्या भाषेची लाज राखता येते’ हे संवाद मनं जिंकून घेतात.

चित्रपटातील ‘लग्नाळू २.o’ गाणं प्रेक्षकांना भरपूर आवडले असून विदुलाची वेगळीच छबी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आली आहे. मैत्रीमध्ये एकमेकांना अडचणीत टाकणं असो किंवा त्याच अडचणीतून त्यांना बाहेर काढण्यासाठीची मदत असो मित्र नेहमीच हाजीर असतात. मैत्रीची व्याख्या नव्या अंदाजात ह्या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. धैर्य, ढुंग्या आणि कबीर यांच्यातील मैत्री खरंच खूप धमाल असणार आहे हे ट्रेलर पाहून वाटत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments