Saturday, March 2, 2024
Homeताजी बातमीपुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी ; वाहनाच्या रांगा…

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी ; वाहनाच्या रांगा…

छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि विकेंड या दोन्ही गोष्टी एकत्र आल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडले आहेत. याचाच परिणाम वाहतुकीवर झाला आहे. परिणामी रस्त्यावर वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत.मुंबईहून- पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी झाल्याने वाहनचालकांना वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे.

पुणे -मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी मध्यरात्रीपासूनच राज्यभरातू शिवभक्त शिवज्योत घेण्यासाठी विविध गडावर दाखल होतायत त्यांचा परिणामही वाहतुकीवर झाला आहे.

कोरोनामुळे दोन वर्षापासून मर्यादित शिवभक्तांच्या उपस्थित शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. मात्र यंदा कोरोना नियमांना शिथिलता मिळाल्यानंतर शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने शिवभक्त शिवनेरीवर दाखल होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments