Thursday, May 23, 2024
Homeमहाराष्ट्रगहुंजे स्टेडियमवर होणाऱ्या श्रीलंका-अफगाणिस्तान क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूकीत बदल

गहुंजे स्टेडियमवर होणाऱ्या श्रीलंका-अफगाणिस्तान क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूकीत बदल

गहुंजे येथे सोमवारी (दि.30) विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2023 मधील श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान हा (World Cup 2023) एकदिवसीय क्रीकेट सामना पार पडणार आहे. हा सामना पाहण्याकरीता खाजगी वाहनांनी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक येतात यावेळी परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी वाहतूकीत बदल कऱण्य़ाचा निर्णय घेतला आहे.तसेच पार्किंग व्यवस्था कोठे व कशी असेल याबाबतही सांगण्यात आले आहे.

हा बदल तात्पुरर्ता असून पुढीलप्रमाणे असेल –

1) मुंबई कडून येणारी वाहने –

देहुरोड वाहतूक विभाग – अ) उसे टोलनाका किवळे ब्रिज पुर्वी 500 मी अंतरावरून डावीकडे वळून पुन्हा डावीकडे यु टर्न घेवून मागुड़ी अंडरपासचे उजव्या बाजूने कुणाल आयकॉन चौकाकडून पुढे दर्शविलेल्या पार्किंगकडे जातील..

च) उसे टोल नाका किवळे ब्रिज उतरुन मुकाई चौक उजये बाजूने किवळे ब्रिज खालून कृष्णा हॉटेल शेजारून मामुर्डी अंडरपासचे डाव्या बाजूने अथवा एमएच 04 बोगद्यातून डावीकडे वळून मामुर्डी अंडरपासचे उजव्या दिशेने कुणाल आयकॉन चौकाकडून पुढे दर्शविलेल्या पार्किंग कडे जातील.

क) सोमाटणे फाटा ते सेंट्रल चौक देहूरोड ते मामूर्डी- शितळादेवी (World Cup 2023) अंडरपास कडे डावीकडे वळून यु टर्न घेवून अंडरपासने पुन्हा डावीकडे वळून लेखा फार्ममार्गे मामुर्डी अंडरपासचे उजव्या बाजूने कुणाल आयकॉन चौकाकडून पुढे दर्शविलेल्या पार्किंग कडे जातील.

ड) सेंट्रल चौक ते मुकाई चौकातून उजव्या बाजूने किवळे ब्रिज खालून कृष्णा हॉटेल शेजारून मामुर्डी अंडरपासचे डाव्या बाजूने अथवा एमएच 04 बोगद्यातून डावीकडे वळून मामुर्डी अंडर पासचे उजव्या दिशेने कुणाल आयकॉन चौकाकडून पुढे दर्शविलेल्या पार्किंगकडे जातील.

2. पुण्याकडून येणारी वाहने-

अ) किवळे ब्रिजचे पूर्वी डाव्या बाजूने सर्विस रोडवरून कृष्णा हॉटेल शेजारून मामुर्डी अंडरपासचे डाव्या बाजूने अथवा एमएच 04 चोगद्यातून डावीकडे वळून मामूर्डी अंडरपासचे उजव्या दिर्शन कुणाल आयकॉन चौकाकडून पुढे दर्शविलेल्या पार्किंगकडे जातील.

(द) पुणे बाजूकडून येणारी वाहणे किवळे ब्रिज उतरल्यावर लगेच डावीकडे वळून मामुर्डी अंडरपासचे उजवे बाजूने कुणाल आयकॉन चौकाकडून पुढे दर्शविलेल्या पार्किंगकडे जातील.

3. सामना संपल्यानंतर कानेटकर बंगला ते साईनगर परिसरातील पार्किंगमधील वाहने साईनगर- सेंट्रल चौक मार्गाने इच्छितस्थळी जातील.

टिप : सेंट्रल चीक साईनगर मार्गे कानेटकर बंगला चौककडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनास बंदी असेल. तसेच मैदानाकडे प्रेक्षक येताना व सामना संपल्यावर परत जाताना त्याचे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांना मज्जाव असेल.

पार्किंग व्यवस्थेकडे कसे जावे -World Cup 2023

1) मुंबईकडून येणा-या प्रेक्षकांच्या वाहनांसाठी –

अ) द्रुतगती मार्गाचे देहुरोड एक्झीट मधून डावीकडे वळावे त्यानंतर तात्काळ परत डावीकडून वळून एक्सप्रेस हायवे लगतच्या मामुडींगायाचे बाजूस असलेल्या सर्विस रोडने स्टेडियमकडे व पार्किंग कडे जाण्याच्या मार्गाचा अवलंब करावा.

ब) द्रुतगती मार्गावरुन येणारी वाहाने किवळे ब्रिजवरुन मुकाई चौक येथून यु टर्न घेऊन कृष्णा चौक मार्ग एक्सप्रेस लगतच्या सिबॉसेस कॉलेच्या बाजुकाडील असलेल्या सर्विस रोडने स्टडीयम कडे व पार्किंग कडे जाण्याच्या मार्गाचा अवलंब करावा

क) जुना मुंबई पुणे हायवे प्रेक्षकांची वाहने सोमाटणे फाटा, सेंट्रल चौक मार्गे बंगलोर हायवे वरील मामुर्डी जकात नाका जवळील अर्डरपास व रस्ताने येणारे प्रेक्षकाच्या वाहनांना शितलादेवी मंदीर येथून मामुर्डी गावात येण्यास बंदी करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग :- सदर मार्गावरील वाहने शितलादेवी मंदीर येथून डाव्या बाजुस वळवून लेखा फार्म मागे असलेल्या सर्विस रोडने स्टडीयमकडे व पार्किंगकडे जाण्याच्या मार्गाचा अवलंब करावा.

2) पुणे बाजुकडून येणा-या प्रेक्षाकाच्या वाहनांसाठी

अ) पुणे बंगलोर हायवेवरून पवनानदी ब्रिज, हॉटेल सॅन्टोंसा पास करुन किवळे ब्रिज वरुन चाहने सावकाश डाव्या बाजुकडे वळवावी व 200 मिटर वरुन दुतगती मार्गाचे डाव्या बाजुचे असलेल्या सर्विस रोडने स्टडीयमकडे व पार्किंगकडे जाण्याच्या मार्गाचा अवलंब करावा.

च) निगडी होंगींग ब्रिज कडुन येणारे प्रेक्षकांची वाहने रावेत चौक, भोंडवे चौक, मुकाई चौक मार्ग कृष्णा चौक येथून उजव्या बाजुस वळून परत एक्सप्रेस हायवे पासून डाव्या बाजुस वळून असलेल्या सर्विस रोडने स्टडीयमकडे व पार्किंगकडे जाण्याच्या मार्गाचा अवलंब करावा.

3) एम सी ए स्टडीयमकडून साईनाथनगर मार्गे येणारा जुना मुंबई पुणे महामार्गाकडे येणारा रस्ता हा एकतफी फक्त जाण्यासाठी वापरण्यात येत आहे. साईनाथ नगर मार्गे स्टेडीयम कडे येण्यासाठी प्रवेश बंदी करण्यात येत आहे.

टिप – सेंट्रल चौक साईनगर मार्गे कानेटकर बंगला चौककडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनास – बंदी असेल.मैदानाकडे प्रेक्षक येताना व सामना संपल्यावर परत जाताना त्याचे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांना मज्जाव असेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments