पुण्यात गहुंजे येथील स्टेडियमवर होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक सामना भारत विरुद्ध बांगलादेश पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी देहूरोड वाहतूक विभागांतर्गत वाहतुकीत बदल केले आहेत. प्रमुख मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिले आहेत.
मामुर्डी अंडरपास ( मासुळकर फार्म) कडून कृष्णा चौकाकडे जाण्यास प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – लोढा कडून येणारी वाहने मामुर्डी अंडरपासपासून उजवे बाजूस वळून बापदेव बुवा पासुन कृष्णा चौकमार्गे जाता येईल
मामुर्डी गावाकडुन मामुर्डी अंडरपास (मासुळकर फार्म) बाजूकडे जाण्यास प्रवेश बंदी
पर्यायी मार्ग – सदर मार्गावरील वाहने मामुर्डी जकातनाका मार्गे.
साईनगर भागातील उपलब्ध करुन दिलेल्या पार्किंग नंबर 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 मधील वाहनांना सामना संपल्यानंतर मामुर्डी अंडरपास बाजूकडे जाण्यास प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – साईनगर रोड ते सेंट्रल चौक मार्गे. शितळादेवी मामुर्डी जकातनाका मार्गे
गहुंजे पुल ते वाय जंक्शनमार्गे स्टेडीयमकडे जाणाऱ्या कार पासधारक वाहनांना तसेच अत्यावश्यक=सेवेतील वाहने सोडून इतर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
मुंबईकडुन येणाऱ्या व देहूरोड एक्झिटकडून एक्सप्रेसवे लगतच्या सर्व्हिसरोडने स्टेडीयमकडे जाणाऱ्या कार पासधारक वाहनांना तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहने सोडून इतर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी आहे.