Friday, September 11, 2026
Homeअर्थविश्वईद-ए-मिलादच्या मिरवणुकीमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या वाहतूक बदल; नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या वाहतूक बदल; नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

हजरत मोहम्मद पैगंबर जयंती (ईद-ए-मिलाद) निमित्त पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी, २६ ऑगस्ट २०२६ रोजी विविध ठिकाणी मिरवणुका काढण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी अनेक प्रमुख मार्गांवर तात्पुरते वाहतूक बदल व प्रवेशबंदी लागू केली आहे.

मिलिंदनगर येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथील पीएमपीएमएल मैदानापर्यंत मुख्य मिरवणूक काढण्यात येणार असून, शहरातील विविध भागांतून नागरिक मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. मिरवणूक आणि सभेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.

पिंपरी परिसरात प्रमुख वाहतूक बदल

बुधवारी दुपारी १२ ते रात्री १२ वाजेपर्यंत महावीर चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकादरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध राहणार आहेत. तसेच नाशिक फाटा, पिंपरी पूल, नेहरूनगर चौक आदी प्रमुख मार्गांवरही वाहतूक वळविण्यात येणार आहे.

याशिवाय जयमल्हार खानावळ सफाटा चौक ते मोरवाडी चौक, सायन्स पार्क ते मोरवाडी चौक, रोमा शोरूम ते गोकुळ हॉटेल तसेच आंबेडकर चौक ते पिंपरी पूल या मार्गांवरही तात्पुरती प्रवेशबंदी करण्यात आली आहे. संबंधित ठिकाणी पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे.

निगडी परिसरातही वाहतूक निर्बंध

निगडी वाहतूक विभागाच्या हद्दीत जुना मुंबई-पुणे महामार्गावरील सेंट्रल चौक ते भक्ती-शक्ती चौक, अंकुश चौक ते भक्ती-शक्ती सर्कल, भक्ती-शक्ती सर्कल ते टिळक चौक तसेच टिळक चौक परिसरातील विविध मार्गांवर वाहतूक बदल करण्यात आले आहेत.

रुद्रा पार्क, फोर्स मोटर्स, खंडोबा माळ चौक तसेच आकुर्डी गावठाण परिसरातील काही मार्गांवरही वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येणार असून वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

चिखली परिसरातील मार्गांवरही बदल

चिखली वाहतूक विभागाच्या हद्दीत कृष्णानगर चौक ते चेरी चौक, जाधव सरकार चौक ते चेरी चौक, चिखली गाव चौक ते डायमंड चौक, पिंगळे चौक ते पाटीलनगर तसेच लक्ष्मी चौक आणि केएसबी चौक परिसरातही तात्पुरते वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

मिरवणुकीच्या हालचालीनुसार आवश्यकतेनुसार संबंधित मार्गांवरील वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर वाहनांवर आवश्यकतेनुसार निर्बंध लागू केले जातील.

वाहनचालक आणि नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, तसेच प्रवासाचे नियोजन वेळेआधी करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments