२५ डिसेंबर
उद्या गुरुवार दिनांक २६ डिसेंबर रोजी , सूर्यग्रहण असल्याने सकाळी ८ ते ११ या वेळेत शिर्डीचे साईबाबा समाधी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात मंदिरात मंत्रोउपचाराचे पठण केले जाणार असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक मुळगीकर यांनी दिली.
नाताळच्या सुट्टीमुळे शिर्डीत भाविकांची गर्दी होत आहे. मात्र, २६ डिसेंबरला ग्रहणकाळात दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. साईंच्या मूर्तीला शॉल घालण्यात येऊन समाधीला तुळसीपत्रांचे अच्छादन करण्यात येणार आहे. ग्रहण संपल्यानंतर साईबाबांच्या मुर्तीला मंगलस्नान घालण्यात येईल. दररोज दुपारी १२ वाजता होणारी मध्यान्ह आरती गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता होणार आहे.