Tuesday, February 27, 2024
Homeआरोग्यविषयकउद्या दि.२४ सप्टेंबर रोजी या केंद्रांवर मिळणार केवळ ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा डोस

उद्या दि.२४ सप्टेंबर रोजी या केंद्रांवर मिळणार केवळ ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा डोस

२३ सप्टेंबर २०२१,
उद्या दि.२४ / ०९ / २०२१ रोजी ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा वय १८ वर्षावरील सर्व लाभार्थींना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या एकुण लाभार्थ्याना खालील नमुद लसीकरण केंद्रावर देण्यात येईल.

तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत दि.११/०८/२०२१ पासून प्रामुख्याने वार्डनिहाय केंद्रीय KIOSK टोकन प्रणालीव्दारे कोविड-१९ लसीकरण करण्यात येत आहे. या अनुषंगाने नागरिकांनी KIOSK मशिनव्दारे घेतलेल्या टोकन नुसार आणि पिं. चिं. म. न. पा. मार्फत लसीकरणाबाबत एस.एम.एस. संदेश प्राप्त झालेल्या नागरिकांना खालील प्रमाणे पिं.चिं.म.न.पा लसीकरण केंद्रांवर लसीकरण करण्यात येईल.

अ.क्र
 प्रभागलसीकरण केंद्राचे नाववयोगट वय वर्षे १८ वर्षावरील सर्व लाभार्थी
पहिला डोसदुसरा डोस  
इ.एस.आय.एस हॉस्पीटल- मोहननगर, चिंचवड१००२००
प्रेमलोक पार्क दवाखाना१००२००
मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल१००२००
जुने खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव१००२००
नवीन भोसरी रुग्णालय१००२००
स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, ‍ शिवतेज नगर, यमुनानगर१००२००
जुने जिजामाता रुग्णालय१००२००
निळु फुले नाटय गृह, पिंपळे गुरव१००२००

सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी-१०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत करण्यात येईल.कोविन अॅप वर नोंदणी करण्यासाठी दि.२४/०९/२०२१ सकाळी ८.०० वाजता स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग,जेष्ठ नागरिक, तृतीयपंथी व पिं.चि.मनपा वार्ड निहाय केंद्रीय KIOSK टोकन प्रणाली नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल.

ज्या नागरिकांची ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा दुसरा डोस निश्चित केलेले दिवस पूर्ण झालेनंतर ही बाकी आहे त्यांनी पिं.चि.मनपा वार्ड निहाय केंद्रीय KIOSK टोकन प्रणाली किंवा कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग करण्याची आवश्यकता नसून त्यांना ‍पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप पध्दतीने लसीकरण करण्यात येईल. स्तनदा व गरोदर महिलांचे कोविड-१९ लसीकरण करणेकामी उद्या दि.२४/०९/२०२१ रोजी वरील लसीकरण केंद्रावर काही डोस राखीव ठेवण्यात येत असून ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने लसीकरण करण्यात येईल.“कोव्हिशील्ड” लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने दि.२४/०९/२०२१ रोजी या लसीचे लसीकरण करण्यात येणार नाही याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments