Sunday, June 15, 2025
Homeआरोग्यविषयकउद्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा केवळ दुसरा डोस 'या...

उद्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा केवळ दुसरा डोस ‘या ‘केंद्रावर मिळणार

१४ जुलै २०२१,
उद्या दि.१५/०७/२०२१ रोजी ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा वय १८ ते ४४ वर्षे लाभार्थींना फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.

तसेच उद्या दि.१५/०७/२०२१ रोजी फक्त वय वर्षे ४५ पुढील वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर २८ दिवसानंतर देण्यात येणार आहे. या अनुषंगाने लसीकरणाचा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.

वय वर्षे १८ ते ४४ वर्ष वयोगटामधील सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण हे कोविन अॅपवर १०० टक्के ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांचेच करण्यात येईल. तसेच कोविन अॅप वर नोंदणी करण्यासाठी दि.१५/०७/२०२१ सकाळी ८.०० नंतर स्लॉट, बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील.

वय ४५ वर्षा वरील सर्व लाभार्थी यांचे लसीकरण हे लसीकरण केंद्रांना उपलब्ध करुन दिलेल्या लसीच्या क्षमतेनुसार ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने करण्यात येईल. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दि.१५/०७/२०२१ रोजी सकाळी ०९.०० वाजले नंतर टोकन वाटप करण्यात येईल त्यामुळे नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थींना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल.स्तनदा व गरोदर महिलांचे कोविड-१९ लसीकरण उद्या दि.१५/०७/२०२१ रोजी बंद राहील. दि. १५/०७/२०२१ रोजी “कोव्हिशील्ड” लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने या लसीचे लसीकरण करण्यात येणार नाही याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments