Friday, September 29, 2023
Homeबातम्यानाशिक राष्ट्रीय महामार्गावरील टोल दरात वाढ…

नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील टोल दरात वाढ…

नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चाळकवाडी आणि हिवरगाव टोल नाक्यांवर आकारण्यात येणाऱ्या टोलमध्ये एक एप्रिलपासून वाढ करण्यात आली आहे. हलक्या वाहनांसाठी प्रत्येकी पाच रुपयांची वाढ झाली आहे.

राष्ट्रीय महामार्गावर दोन वर्षांनी टोलवाढ करण्यात येते. मात्र, चाळकवाडी टोलनाका २०१७ साली बंद पाडण्यात आला होता. तो गेल्या आर्थिक वर्षांत पुन्हा सुरू करण्यात आला. त्यामुळे २०१७ मधील दरानुसार गेल्या वर्षी चाळकवाडी टोलनाक्यावर कार आणि हलक्या वाहनांच्या एकेरी प्रवासासाठी ४५ रुपये आणि दुहेरी प्रवासासाठी ७० रुपये टोल द्यावा लागत होता. आता दरवाढीनंतर कार आणि हलक्या वाहनांना एकेरी प्रवासासाठी ५० रुपये आणि दुहेरी प्रवासासाठी ८० रुपये टोल आकारला जाणार आहे. हलकी व्यावसायिक वाहने, मिनी बससाठी ८५ रुपये, बस आणि ट्रकच्या एकेरी प्रवासासाठी १७५ रुपये टोल आकारण्यात येणार आहे.

हिवरगाव पावसा टोलनाक्यावर कार आणि हलक्या खासगी वाहनांच्या एकेरी प्रवासासाठी ८५ रुपये आणि दुहेरी प्रवासासाठी १३० रुपये आकारले जात होते. आता त्यासाठी अनुक्रमे ९० रुपये आणि १४० रुपये टोल द्यावा लागणार आहे. हलकी व्यावसायिक वाहने, मिनी बससाठी १५५ रुपये, बस आणि ट्रकसाठी ३२० रुपये टोल द्यावा लागेल, असे महामार्ग प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

चाळकवाडी टोलनाका (नवे दर)

एकेरी प्रवास- ५० रुपये,दुहेरी प्रवास -८० रुपये

(कार आणि हलकी खासगी वाहने) हिवरगाव पावसा टोलनाका (नवे दर)

एकेरी प्रवास-९० रुपये,दुहेरी प्रवास १४० रुपये

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments