पुण्यातील लोहगाव, ढोले पाटील रोड, पद्मावती पंपिंग स्टेशन, सहकार नगर, औंध, गुरुवार पेठ, एनआयबीएम रोड, शनिवार वाडा, कसबा पेठ, धानोरी, कर्वेनगर, एम जी रोड अशा अनेक ठिकाणी या घटना घडल्या. या घटनेत सुदैवाने कोणी ही जखमी झालेले नाही. धुळे तालुक्यातील निमगु सह जिल्ह्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाने सकाळच्या सुमारास जोरदार हजेरी लावली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे. बाजरी, ज्वारी, त्याचबरोबर भुईमुंग आणि कांदा पिकाचे नुकसान देखील होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.
नाशिकच्या मालेगावमध्ये रात्रभर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यातच रात्रभरापसून विजेचा पुरवठा खंडित झाल्याने नागरिक त्रस्त झाले झाले होते. परिसरात काही ठिकाणी वीज पडल्याच्या देखील घटना घडल्या (Weather Update) आहेत. राज्यात उष्णतेचे उच्च तापमान असणाऱ्या मालेगावाच्या वातावरणात पावसामुळे काहीसा गारवा निर्माण झाला आहे. जोरदार पावसामुळे कॉलेज ग्राऊंडवर सर्वत्र पाणी साचून त्याला तळ्याचे स्वरूप आले. नाशिक जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही प्रचंड वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने चांगले झोडपले आहे. या पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसामुळे पिकांना मोठा फटका बसत असल्याच्या बातम्या आपण नेहमी ऐकतो. मात्र, या अवकाळी पावसामुळे थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमधील वातावरण अधिक अल्हाददायक बनलं (Unseasonal Rain) आहे. गेले काही दिवस संपूर्ण महाराष्ट्राप्रमणेच माथेरानमधील वातावरण देखील तापलं होतं. काल अवकाळी पावसाने माथेरानमध्ये हजेरी लावली. येथील वातावरण बदलून गेले आहे. वातावरणातील उष्णता आता कमी झाली आहे. गुलाबी थंडी अनुभवायला मिळत आहे.
सावंतवाडी आणि कुडाळ तालुक्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाला आहे. येथे विजांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. अचानक आलेल्या पावसाने सर्वांचीच तारांबळ उडाली होती.उष्णतेपासून हैराण झालेल्या नागरिकांना पावसापासून निर्माण झालेल्या गारव्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
अमरावती जिल्हात अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे १ कोटी रुपयांचा संत्रा मातीमोल झाला आहे. एप्रिलमध्ये झालेल्या संत्राच्या नुकसानीचा अहवाल तयार करण्यात आला आहे. मतदानानंतर बाधित पिकांचे पंचनामे करण्यात आले आहेत. ३८ हजार हेक्टरवरील संत्रा बाधित तर २० हजार हेक्टरवर भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे.
राज्यात विविध ठिकाणी अवकाळीने चांगले झोडपले आहे. अमरावती, संधुदुर्ग नाशिक आणि बारामती शहरांमध्ये वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. बारामतीत मुसळधार पाऊस (Maharashtra Unseasonal Rain) झाला आहे. अनेक घरांवरील पत्रे उडाल्यानं मोठं नुकसान झालं आहे. नांदगाव, मनमाडसह परिसरात विजांच्या कडकडाटामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. मनमाड शहरासह परिसरात पाऊस सुरू होताच वीज गायब झाली आहे. पुण्यात काल झालेल्या पावसामुळे पुणे शहरात ३० ठिकाणी झाडपडीच्या घटना घटल्या आहेत.