२३ डिसेंबर
झारखंड विधानसभेच्या ८१ जागांसाठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी होत आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासून ही मतमोजणी सुरू झाल्यानंतर
झारखंड विधानसभा निवडणूक निकालाची कल पाहता काँग्रेस आणि मित्रपक्ष बहुमताकडे वाटचाल करत आहेत. ८१ विधानसभेच्या जागा असलेल्या झारखंडमध्ये सत्तास्थापनेसाठी बहुमताचा जादुई आकडा आहे ४१. आज सकाळी पावणे बारा वाजेपर्यंत काँग्रेस ४०, भाजप ३०, एजेएसयूपी ५, जेव्हीएम 3 आणि इतर 3 जागांवर आघाडीवर आहेत. या पूर्वी मतदान सुरू झाल्यापासून सतत झारखंड मुक्ती मोर्चा आघाडी आणि भाजपदरम्यान जोरदार टक्कर पाहायला मिळत होती.
महाराष्ट्रात सर्वात जास्त जागा मिळूनही सत्तेबाहेर फेकल्या गेलेल्या भारतीय जनता पक्षाला झारखंड विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसल्याचे स्पष्ट होत आहे.