Sunday, July 20, 2025
Homeताजी बातमीआज शनिवारी वाल्हेकर वाडीत बहुजन संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने आंबेडकर जयंती महोत्सव

आज शनिवारी वाल्हेकर वाडीत बहुजन संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने आंबेडकर जयंती महोत्सव

बहुजन मित्र पुरस्कार शंकर जगताप यांना तर सूर्योदय शेट्टी यांना विशेष पुरस्कार जाहीर 

चिंचवड मधील बहुजन संघर्ष प्रतिष्ठान ही संस्था मागील बारा वर्षांपासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक व आरोग्य विषयक कार्यक्रमाचे आयोजन करीत असते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त शनिवारी (दि.२७) छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाल्हेकर वाडी, चिंचवड येथे सायंकाळी सहा वाजता आयोजित केलेल्या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा बहुजन मित्र पुरस्कार देऊन आणि सूर्योदय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सूर्योदय उर्फ बाबू शेट्टी यांचा विशेष पुरस्कार देऊन माजी मंत्री दिलीप कांबळे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती बहुजन संघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मनोज तोरडमल यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

यावेळी इंडियन आयडॉल सोनी टीव्ही व सुर नवा ध्यास नवा कलर्स मराठी फिल्म रॉकस्टार संतोष जोंधळे यांचा भीम गीतांचा कार्यक्रम होणार आहे. 

प्रमुख पाहुणे आमदार महेश लांडगे, अण्णा बनसोडे, उमाताई खापरे, माजी खासदार अमर साबळे, राज्य लेखा समितीचे माजी अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी पक्षनेते नामदेव ढाके, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे आदी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती संस्थेच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments