Sunday, September 8, 2024
Homeताजी बातमीपावसाळी अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस ; अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता ; कोणते...

पावसाळी अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस ; अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता ; कोणते मुद्दे गाजणार?

विरोधकांना नामोहरम करुन आपल्यासोबत येण्यास भाग पाडायचे, जे येणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करायची, जे येतील त्यांना संरक्षण द्यायचे, ज्यांच्यावर आरोप केले ते सोबत आल्यानंतर त्यांना निर्दोषत्वाचं सर्टीफिकेट देऊन “पवित्र” करुन टाकयचे, हे सारं लोकशाहीसाठी मारक आहे, संविधानविरोधी आहे, याचीही नोंद विधीमंडळाच्या या अधिवेशनाच्या निमित्तानं घेण्यात यावी, असे विरोधकांनी म्हटलेय.

महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Session 2023) आजपासून (17 जुलै, सोमवारी) सुरु होत असून, ते 14 ऑगस्टपर्यंत सुरू चालणार आहे. हे अधिवेशन मुंबईत (Mumbai) पार पडणार असून 15 दिवस सुरू राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) बंड झाल्यानंतर खातेवाटपाचा घोळ सुरु होता. अखेर शुक्रवारी खातेवाटप जाहीर झालं. त्यात अजित पवार यांच्या गटाकडं मातब्बर खाती आल्याचं मानण्यात येतंय. त्यात अजित पवार यांना अर्थ खातं मिळालेलं आहे. तर शिंदे गट नाराज असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, आता तीन पक्षांचे सरकार तसेच दोन उपमुख्यमंत्री असल्यामुळं काम अधिक प्रभावी होईल, कारण मुख्यमंत्री किंवा एक उपमुख्यमंत्री जर अनुपस्थित राहिले तर दुसरा उपमुख्यमंत्री हजर असेल. त्यामुळं कामं थांबणार नाहीत, तसेच अजित पवार यांना प्रशासनातील कामकाजांना मोठा अनुभव असल्यामुळं त्याचा फायदा सरकारला होईल. (Monsoon Session of Maharashtra Legislative Assembly) तसेच आता विरोधीपक्ष नेताच सत्तेत गेल्यामुळं विरोधकांची धार कमी होणार आहे, त्यामुळं विरोधकांकडून कुठले चेहरे आक्रमक होणार यावर चर्चा सुरु आहे. काल राज्य सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. (Maharashtra Monsoon Session)

चहापानावर विरोधकांनी बहिष्कार…

दरम्यान, नेहमीप्रमाणे पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला, सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित चहापान कार्यक्रम केला गेला. पण विरोधकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातलाय. लोकशाहीच्या प्रथा, परंपरेप्रमाणे विधीमंडळाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापान कार्यक्रमास उपस्थित राहून राज्यासमोरील प्रश्नांबाबत विचारविमर्श करण्यास आम्हाला निश्चितंच आवडले असते. परंतु, गत वर्षभरात राज्यातील घडामोडी पाहता, राज्यात आणि देशात लोकशाही शिल्लक उरली नसल्याचे भेसूर चित्र समोर येत आहे. विरोधी गटातील राजकीय पक्ष फोडून पक्षच पळवून नेण्याचे सुरु असलेले राजकारण पहाता राज्यात लोकशाहीचा दर्जाच घरलेला आहे. तसेच लोकशाही टिकविण्याची जबाबदारी असलेल्या स्वायत्त संस्थाचा वापर विरोधी पक्षाच्या सदस्य व कार्यकर्ते यांच्यावर दबाव तंत्र निर्माण करण्यासाठी करण्यात येत आहे. विरोधी पक्षातील नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करायचे, तपास यंत्रणावर दबाब टाकून त्यांचेवर कारवाई करायची, विरोधकांना नामोहरम करुन आपल्यासोबत येण्यास भाग पाडायचे, जे येणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करायची, जे येतील त्यांना संरक्षण द्यायचे, ज्यांच्यावर आरोप केले ते सोबत आल्यानंतर त्यांना निर्दोषत्वाचं सर्टीफिकेट देऊन “पवित्र” करुन टाकयचे, हे सारं लोकशाहीसाठी मारक आहे, संविधानविरोधी आहे, याचीही नोंद विधीमंडळाच्या या अधिवेशनाच्या निमित्तानं घेण्यात यावी, असे विरोधकांनी म्हटलेय.

विरोधकांत कोणते नेते आक्रमक

या पावसाळी अधिवेशनाच्या पंधरा दिवस आधी म्हणजे २ जुलैला अजित पवारांनी राष्ट्रवादीतून बंड केले आहेत, त्यामुळं विधानसभा विरोधी पक्षनेते हे काँग्रेसकडे जाण्यची शक्यता आहे. तसेच मविआतील तीन पक्ष म्हणजे ठाकरे गट, काँग्रेस व शरद पवार गट हे आक्रमक होणार असून, शेतकरी कर्ज, महागाई, बेरोजगार, शिक्षक भरती प्रश्न, महिला अत्याच्यार आदी प्रश्नांवरुन विरोधक आक्रमक होणार असल्याचं बोललं जातंय. तसेच आता आता विरोधीपक्ष नेताच सत्तेत गेल्यामुळं विरोधकांची धार कमी होणर आहे, त्यामुळं विरोधकांकडून कुठले चेहरे आक्रमक होणार यावर चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, तर ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे, अंबादास दानवे हे चेहरे अधिवेशनात आक्रमक बोलतील, अशी शक्यता आहे.

या मुद्दावर अधिवेशनात वादळी ठरणार…

मागच्या अधिवेशनात अनेक नेत्यांच्या चौकश्या, भ्रष्टाचाराची प्रकरणे या मुद्द्यांवर ही अधिवेशने गाजली. ठाकरे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवरही आंदोलने केली. सत्ताधाऱ्यांना पाहून जोरदार आणि सभागृहाबाहेरही सरकारवर आरोपांची सरबत्ती करण्यात येत होती. मात्र, आता गेल्या वर्षभरात विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आता सरकारमध्ये सहभागी झाल्याने परिस्थिती बदलली आहे. सरकारविरोधात आक्रमक होणारे राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार अजित पवार यांच्यासोबत भाजपाच्या वळचणीला आले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद क्षीण झाली आहे. तीन पक्षाचे सरकार आल्यानंतर हे अधिवेशन पहिलेच आहे. तसेच पुढील वर्षी विधानसभा व लोकसभा निवडणुका असल्यामुळं त्याआधी अर्थमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्प मांडतील. त्यात भरीव योजना व आश्वासनांची खैरात असणार आहे. परंतु या पावसाळी अधिवेशनात प्रामुख्याने शेतकरी कर्ज, महागाई, बेरोजगार, शिक्षक भरती प्रश्न, महिला अत्याच्यार हे मुद्दे महत्वाचे असणार आहेत, यावर विरोधक आक्रमक होणार आहेत.

विरोधी पक्षनेता आज ठरणार…

अजित पवार यांनी बंड करत सरकारमध्ये सामील झाल्याने त्यांच्याकडील विरोधीपक्षनेतेपद काँग्रेसच्या वाट्याला जाणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्याकडील आमदारांची संख्या कमी आहे. काँग्रेसकडे सर्वाधिक आमदार आहेत, त्यामुळे विरोधीपक्षनेतेपद काँग्रेसला जाणार हे जवळपास निश्चित मानले जातेय. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी सहमती दर्शवल्याचेही समजतेय. पावसाळी अधिवेशनाच पहिला दिवस सत्ताधारी की विरोधक कोण गाजवणा हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काँग्रेसचा विरोधी पक्षनेता सोमवारी म्हणजे आज जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहेत. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि विजय वडेट्टीवार काँग्रेसमधील ही नाव चर्चेत आहेत.

काँग्रेसकडून ‘या’ नावांची चर्चा

काँग्रेसकडे सर्वाधिक आमदार आहेत, त्यामुळे विरोधीपक्षनेतेपद काँग्रेसला जाणार हे जवळपास निश्चित मानले जातेय. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि विजय वडेट्टीवार काँग्रेसमधील ही नाव चर्चेत आहेत. तर सुनील केदार, विजय वड्डेटीवर, यशोमती ठाकूर, संग्राम थोपटे यांच्या नावाची सध्या काँग्रेसमध्ये जोरदार चर्चा आहे. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष राहणार आहे. बाळासाहेब थोरात काँग्रेस गटनेते राहणार त्यात बदल नाही, असे समजतेय.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments