Thursday, May 23, 2024
Homeताजी बातमीपुण्यात आज पॉलिटिकल फ्रायडे, पोटनिवडणुकीच्या प्रचार आज थांबणार…!

पुण्यात आज पॉलिटिकल फ्रायडे, पोटनिवडणुकीच्या प्रचार आज थांबणार…!

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आजच (24 फेब्रुवारी) शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळी पाच वाजता प्रचार थांबणार आहे. त्याआधी रोड शो करुन, सभा घेऊन अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय नेते करणार आहेत.

पुण्यात कोणाकोणाचे रोड शो.. ?

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कसब्याचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यासाठी दुपारी एक वाजता महात्मा फुले वाड्यापासून रोड शो करणार आहेत.
  • तर कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सकाळी अकरा वाजता रोड शो करणार आहेत.
  • चिंचवड मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अश्विन जगताप यांच्यासाठी बैठका आणि प्रचार रॅली करणार आहेत
  • नाना काटे यांच्यासाठी अजित पवार चिंचवडमधे रोड शो करणार आहेत.

शिंदे फडणवीसांची कसब्यातील कालची सभा अचानक रद्द….

दरम्यान कसबा मतदारसंघातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कालची सभा अचानक रद्द झाली आहे. कसबा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी काल डेक्कनच्या नदीपात्रात संध्याकाळी पाच वाजता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र ही सभा ऐनवेळी भाजपकडून रद्द करण्यात आली आहे. त्या ऐवजी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा रोड शो होणार आहे. जाहीर सभा घेण्यापेक्षा रोड शोच्या माध्यमातून जास्त लोकांपर्यंत पोहचता येईल. त्यामुळे सभा रद्द केल्याचं माजी महापौर मुरलीधर मोहोळांनी सांगितलं आहे. मात्र प्रचार जोरात सुरु असताना ऐनवेळी सभा रद्द केल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

पोटनिवडणुकीसाठी 26 फेब्रुवारीला मतदान, 2 मार्चला निकाल
चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली. तर कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त जागेवर पोटनिवडणूक होत आहे. पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी येत्या 26 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 2 मार्च रोजी जाहीर करण्यात येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments