१९ जानेवारी २०२०,
मुंबईत पहिल्या लढतीत ऑस्ट्रेलियाकडून मानहानीकारक पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघाने कात टाकली आणि राजकोटच्या दुसऱ्या लढतीत शानदार विजयानिशी मालिकेत बरोबरी साधली. त्यामुळे तिसऱ्या लढतीद्वारे मालिकेवर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या इराद्याने एकदिवसीय क्रिकेटमधील दोन तुल्यबळ संघ रविवारी बेंगळूरुत खेळतील.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात भारतीय संघासमोर एक मोठे संकट उभे राहिले आहे. मालिकेत पहिल्या सामन्यात मानहानीकारक पराभव पत्कारल्यानंतर भारतीय संघाने राजकोट येथे शानदार विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधली. आता तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात दोन्ही संघ विजयासाठी खेळतील. बेंगळुरूच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात भारतीय संघासमोर समालामीच्या जोडीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. राजकोट येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात शिखर धवन याला फलंदाजी करताना दुखापत झाली होती. तर रोहित शर्माला फिल्डिंग करताना ४३व्या षटकात खांद्याला दुखापत झाली होती. भारताची ही ओपनर जोडी खेळणार की नाही याबद्दलचा निर्णय सामना सुरू होण्यापूर्वी घेतला जाणार आहे.