Wednesday, May 14, 2025
Homeताजी बातमीटाइम्स नाऊ आणि सी-व्होटरचा Opinion Poll , विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचं पानीपत होणार…?

टाइम्स नाऊ आणि सी-व्होटरचा Opinion Poll , विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचं पानीपत होणार…?

९ मार्च २०२१,
चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचं पानीपत होताना दिसत आहे. टाइम्स नाऊ आणि सी-व्होटरच्या सर्व्हेनुसार पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी यांचं सरकार येणार असून तामिळनाडूत काँग्रेस आघाडीची सत्ता येणार आहे. तर केरळात पुन्हा एकदा डाव्यांचंच पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजे या तिन्ही मोठ्या राज्यांमध्ये भाजपला मोठ्या पराभवाला समोरे जावे लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.

पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला सत्ता मिळवण्यात यश आलं तरी त्यांना विजयी जागांच्या संख्येत मोठा फटका बसण्याची चिन्हं दिसत आहेत. भाजपाला यंदा पश्चिम बंगालमध्ये मोठ्या संख्येने मतदान होईल आणि जास्त जागा भाजपाला जिंकता येतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. पश्चिम बंगालच्या विधानसभेमध्ये एकणू २९४ जागा आहेत. त्यापैकी १५४ जागांवर ममतांच्या पक्षाला विजय मिळेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. २०१६ साली मिळालेल्या २११ जागांपेक्षा हा आकडा ५७ ने कमी आहे. भाजपाला २०१६ मध्ये पश्चिम बंगालमध्ये केवळ तीन जागा मिळाल्या होत्या. यंदा मात्र भाजपाला १०७ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपाची ताकद वाढणार आहे. काँग्रेस आणि डाव्या पक्षांना बंगालमध्ये केवळ ३३ जागा मिळतील असं या सर्वेक्षणामध्ये म्हटलं आहे.

आसाम

आसाममधील निवडणुकीमध्ये १२६ जागांपैकी ६७ जागा भाजपा आणि मित्र पक्षांना मिळतील तर ५७ जागांवर काँग्रेस आणि मित्र पक्षांना यश मिळेल असा अंदाज आहे. २०१६ साली भाजपा आणि मित्र पक्षांना ८६ तर काँग्रेस आणि मित्र पक्षांना केवळ २६ जागांवर विजय मिळवता आलेला.

तामिळनाडू

तामिळनाडूमध्ये डीएमके आणि काँग्रेसच्या युतीची थेट लाढाई एआयएडीएमके आणि भाजपाच्या युतीशी होणार आहे. डीएमके आणि काँग्रेसला २३४ पैकी डीएमकेला १५८ जागा मिळत असं सांगितलं जात आहे. तर एआयएडीएमके आणि भाजपाला ६५ जागांवर विजय मिळेल असा अंदाज या सर्वेक्षणामधून बांधण्यात आलाय.

केरळ

केरळमध्ये मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफला पुन्हा एकदा सत्ता मिळेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. १४० सदस्यांच्या विधानसभेमध्ये ८२ जागांवर एलडीएफचा विजय होईल असा अंदाज आहे. काँग्रेस आणि युडीएफला केरळमध्ये ५६ जागांवर विजय मिळेल असं या सर्वेेक्षणामधून दिसत आहे. भाजपासाठी केरळमध्ये या निवडणुकीमध्येही अच्छे दिन येण्याची शक्यता या सर्वेक्षणामधून दिसत नाहीय. भाजपाला मागील निवडणुकीप्रमाणे केवळ एका जागेवर समाधान मानावं लागेल असं सांगितलं जात आहे.

पुद्दुचेरी

पुद्दुचेरीमधील विधानसभेच्या ३० जागांपैकी १८ जागांवर भाजपा आणि मित्र पक्षांना यश मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला १२ जागांवर विजय मिळेल असा अंदाज बांधला जातोय.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments