Tuesday, February 18, 2025
Homeगुन्हेगारीरिल्स बनवण्यासाठी चांगला मोबाईल हवा म्हणून चोरी करणाऱ्या टिकटॉक स्टारला अटक...

रिल्स बनवण्यासाठी चांगला मोबाईल हवा म्हणून चोरी करणाऱ्या टिकटॉक स्टारला अटक…

पुणे जिल्ह्यात एका टिकटॉक स्टारला अटक करण्यात आली. सोशल मीडियावर रिल्स बनवण्याची हौसच एक तरुणाच्या अंगलट आली. रिल्स बनवण्यासाठी चांगला मोबाईल फोन हवा, म्हणून या टिकटॉक स्टारने चक्क चोरी करण्याचं ठरवलं. रिल्सच्या नादात चोर बनलेल्या या तरुणाला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. रांजणगाव पोलिसांनी या तरुणावर गुन्हा नोंदवून घेतलाय.

संजय बोऱ्हाडे असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. सोशल मीडियावर त्याला 50 हजार पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. संजयला अटक करण्यात आल्याचं कळल्यानंतर त्याच्या फॉलोअर्सनाही धक्काच बसलाय. रिल्स बनवण्यासाठी संजय बोऱ्हाडे या तरुणाने मोबाईलची चोरी केल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलंय.अटक करण्यात आलेला आरोपी संजय बोऱ्हाडे हा पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती येथील परिसरात राहतो. त्याला रिल्स, टिकटॉक व्हिडीओ बनवण्याचा छंद आहे. फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी त्याला चांगल्या दर्जाचा मोबाईलची गरज भासत होती.

नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी संजयकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्याने अखेर मोबाईलची चोरी केली. या चोरीप्रकरणी संजयवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. रांजणगाव एमआयडीसी पोलीस याप्रकरणी सध्या पुढील कारवाई करत आहेत.

गेल्या काही वर्षांत रिल्स बनवण्याचा छंद अनेकांना जडलाय. फेसबुक, इन्स्टाग्रामवर रिल्स बनवण्यासाठी अनेकजण कायदाही मोडत असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. रिल्सच्या नादात कशाचंही भान न राहिलेल्यांनी या घटनेतून बोध घेण्याची गरज व्यक्त केली जातेय. सोशल मीडिया रिल्सच्या नादात कायदा मोडणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही, असा इशारा पोलिसांच्या वतीने देण्यात आलाय.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments